WHO
|

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत WHO’ ने जारी केल्या नव्या सूचना; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ( world health organization) च्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत भीती दर्शवली आहे. यानंतर आता WHO कडून नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यात त्यांनी माध्यमांना सांगितले कि, जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन पसरतो आहे आणि तो अत्यंत घातक आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट जगभरात वणव्यासारखा पसरत असल्यामुळे WHO चे आपात्कालीन विभागाचे अधिकारी कॅथरिन स्मॉलवूड यांनी धोक्याचा इशारा देत कॅलिफोर्निया टाइम्सला मुलाखत दिली आहे. दरम्यान त्यांनी काही नव्या सूचना जारी केल्या आहेत.

स्मॉलवूड यांनी कॅलिफोर्निया टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “ओमिक्रॉन ज्या वेगाने पसरत आहे तितका तो प्रसारित होण्याचा आणि प्रतिकृती बनवण्याची शक्यता अधिक आहे. सध्या ओमिक्रॉन प्राणघातक आणि संभाव्य प्राणघातक आहे. पण तो डेल्टा पेक्षा जरा कमी प्राणघातक आहे,”

WHO OFFICE

पुढे, त्याच्या कमी तीव्रतेमुळे, शास्त्रज्ञांना आशा आहे की आपण लवकरच या रोगावर मात करू आणि पुन्हा पूर्वीसारखे जगू. मात्र, महामारीच्या सुरुवातीपासून युरोपमध्ये १० कोटी हून अधिक कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे आणि २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात ५० लाखांहून अधिक नवी प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे चिंता अधिक आहे. त्यामुळे नव्या सूचनेनुसार, लवकरात लवकर लसीकरण मोहीम वेगाने राबवावी. १००% लसीकरणाकडे भर द्या. संबंधित नियमावलीचे काटेकोर पालन करण्याकडे लक्ष द्या. जगभरातील सार्वजनिक ठिकाणी तूर्तास फिरणे टाळा. सुरक्षित अंतर, मास्क आणि स्वच्छ्ता याच गोष्टी संसर्गापासून आपले रक्षण करतील.

WHO

मीडिया रिपोर्ट नुसार, फ्रान्समध्ये ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी एकाच दिवसात २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय भारतातही काही फारशी बरी स्थिती नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. परिणामी पुन्हा देशातील वाहतूक, शाळा आणि अन्य सेवांमध्ये अडथळा आला आहे. मात्र सरकार अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून लॉकडाऊन टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.