तुमचे पाय काळे का पडतात ? जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपले पाय हे जर स्वच्छ नि सुंदर असतील तर त्यावेळी पायाचे सौदर्य हे खुलून दिसायला मदत होते. आपल्या फेसच्या त्वचेसाठी आपण अनेक वेगवेगळ्या टिप्स वापरतो. पण मात्र आपण आपल्या पायांसाठी कोणतेच प्रॉडक्ट वापरत नाहीत . पण आपले पाय हे खराब किंवा काळे का पडतात ? याची कारणे काय आहेत ते जाणून घेऊया ……..
कारणे —
पायाला सतत ऊन लागणे —
जर तुमचा पाय हा जास्त वेळा उन्हात उघडा राहत असेल तर त्यावेळी मात्र तुमचा पाय हा काळा पडायला सुरुवात होते . आजकाल सगळे तरुण तरुणी प्रत्येक सिझन मध्ये बुटाचा वापर करतात असे नाही . वेगवेगळ्या कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या चपला या वापरल्या जातात. त्यामुळे आपल्या पायाला उन्हाचा चटका हा जास्त बसतो. त्यामुळे आपल्या पायांवर टॅन हा वाढू शकतो.
चपला लागणे —
कोणतीही मुलगी हि अजिबात एका चपलांचा वापर करत नाहीत . वेगवेगळ्या ड्रेस वर वेगवेगळ्या चपलांचा वापर हा केला जातो. त्यामुळे जी काही मऊ चपला असेल तर त्याचा फक्त वापर होताना त्रास होत नाही . जी जाड आणि कठीण चपला असतील तर त्यामुळे अंगठ्याना दुखापत होऊ शकते . आणि तो भाग हा काळा पडायला सुरुवात होते .
पाय धुण्याचा कंटाळा —
जर आपण बाहेरून मातीतून आलो असेल तर त्यावेळी मात्र पाय धुणे हे फार गरजेचे असते . पाय धुताना नेहमी आपल्या पायांवर जी काही माती किंवा धूळ बसली असेल तर ती धूळ दूर करण्याचा प्रयत्न करा. तरच तुमचे पाय हे स्वच्छ राहतील. आणि काळे पण पडणार नाहीत .अनेक जण बाहेरून आल्यानंतर पाय धुण्याचा कंटाळा करतात . किंवा बाहेरून आलो म्हणून ते पायावर पाणी घेतात . त्यामुळे पायांची घाण काही निघत नाही .
भेगा पडणे —
हिवाळ्याच्या दिवसांत पायाला खूप जास्त प्रमाणात भेगा पडायला सुरुवात होते . पायांना भेगा पडल्यानंतर काही वेळा त्याची काळजी घेणे गरजेचे असते . काहींना हा त्रास फक्त थंडीत होतो तर काहींना कायमचा या भेगांमुळे तुमच्या पायांचे सौंदर्य बिघडते. त्यामुळे भेगा पडल्यानंतर मात्र काळजी घेणे गरजेचे असते .