कानात मळ का साचतो आणि तो काढायचा कसा?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। कानात मळ साचणे हि अतिशय सामान्य बाब आहे. मात्र तो स्वच्छ न केल्यास उदभवणाऱ्या समस्या गंभीर बाब होऊ शकतात. कानात साचलेल्या मळामुळे बऱ्याचदा इन्फेक्शन होऊ शकते आणि यामुळे कानाशी संबंधीत इतर समस्या अधिक वाढू शकतात. ज्यामुळे कमी ऐकू येणे तसेच कान बंद पडणे, कान दुखणे आणि कानातून पाणी येण्यासारख्या समस्या होऊ शकतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत कि कानात मळ का येतो आणि तो साचल्यास काढायचा कसा ते खालीलप्रमाणे:-
० कानात मळ का साचतो ?
– कानात मळ साचणे हि नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमागील मूळ कारण म्हणजे कानात बाहेरील बॅक्टेरिया व कीटक कानात जाण्यापासून रोख लावणे. यामुळे बाह्य घटकांपासून कानाच्या आतील पडद्यांचे रक्षण होते. म्हणूनच दररोज कानातील मळ काढणे कानाच्या आरोग्यासाठी हितवर्धक नाही. याशिवाय कानात कोणतीही टोकदार वस्तू वा काडी घालू नये. असे केल्यास कानात नियमित मळ साचतो. म्हणूनच नियमित कानात बाह्य वस्तू टाकून स्वच्छ करणे हि सवय मोडावी. जर आपल्याला कानातील मळ स्वच्छ करायचा असेल तर तो महिन्यातून एकदा करावा. यासाठी तुम्ही खालील उपायांचा वापर करू शकता.
१) नारळाचे तेल – कानातील मळ सहज काढण्यासाठी नारळाचे तेल मदत करते. यासाठी फक्त १ चमचा नारळाचे तेल हलके गरम करा. यानंतर तेल कोमट झाल्यावर एका ड्रॉपरच्या मदतीने त्याचे काही थेंब कानात टाका. ज्या कानात तेल टाकालं त्याला साधारण १० मिनिटे वरच्या बाजूला करून झोपा. यानंतर कानाला खालच्या बाजूला करून कानातील तेल बाहेर निघू द्या. असे केल्याने कानातील मळ नरम होऊन आपोआप बाहेर येईल.
२) बेबी ऑइल – बेबी ऑइल म्हणजे लहान बाळांचे तेल. हे तेल एक प्रकारचे मिनरल ऑइल असते. त्यामुळे कानातील मळ बाहेर काढण्यासाठी ते मदतयुक्त ठरते. यासाठी एका ड्रॉपरच्या मदतीने बेबी ऑइलचे काही थेंब कानात टाका. यानंतर कानाला कापसाच्या तुकड्याने बंद करा. कानात कापूस लावल्यामूळे तेल कानातून बाहेर येणार नाही. थोड्या वेळाने कापसाचा बोळा काढल्यास मळ त्यावर चिकटलेला दिसेल.
३) ग्लिसरीन – ग्लिसरीन त्वचेला मुलायम आणि सुंदर करण्यासाठी मदत करते. शिवाय यात कान स्वच्छ करणारे असतात. त्यामुळे एक चमचा पाण्यात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळून हे पाणी कानात टाका. पुढे ५ ते १० मिनिटांनी कानाला उलटे करून सर्व पाणी बाहेर काढा आणि मुलायम कापडाने कान पुसा.
० कानातील मळ काढण्यासाठी औषध
४) हायड्रोजन पेरॉक्साइड – हायड्रोजन पेरॉक्साइडला हायड्रोजन डाय-ऑक्साइड देखील म्हटले जाते. हे लिक्विड कोणत्याही औषधाच्या दुकानात मिळते. याचा उपयोग कानातील मळ काढण्यासाठी केला जातो. या औषधाचा वापर पुढील प्रमाणे करा:-
– एका ड्रॉपरच्या मदतीने हायड्रोजन पेरॉक्साइडचे ३ ते ४ थेंब कानात टाका. हे लिक्विड कानात टाकल्यावर काही वेळ कानात बुडबुडे निर्माण होणे, खाज सुटणे व चलबिचल वाटणे इ. लक्षणे दिसतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका. या औषधाच्या वापराने हायड्रोजन पेरॉक्साइडसोबत कानातील सर्व मळ बाहेर निघून येतो.