तरुण वयात हृदयविकाराचा धोका का बरं वाढतोय ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजकाल ची तरुण पिढी हि खूप व्यस्त असते . त्याच्या राहण्या – खाण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत . आजकाल नवीन पिढीचे जीवनमान हे खूप बदलत चालले आहे. . त्यांच्या सवयी या खूप वेगवेगळ्या असतात . ना झोपण्याच्या योग्य वेळा आणि ना खाण्यापिण्याच्या योग्य वेळा त्यामुळे अनेक तरुण- तरुणींचे जीवन हे नैराश्यात जाताना दिसते . सतत कोणत्या ना कोणत्या कामाचे असलेले टेन्शन यामुळे त्यांना हृदयाचे धोके हे निर्माण होताना दिसतात . पूर्वीच्या काळी हृदयाच्या समस्या या जास्त प्रमाणात उतरत्या वयातील लोकांना जाणवत होत्या , पण आजकाल नवीन पिढीला सुद्धा अशा समस्या जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे .
अनेक वेळा मुले नैराश्यामुळे व्यसनाच्या आहारी जाताना दिसतात .त्यामुळे अचानक त्यांना कार्डियाक अटॅक येऊन त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते . कार्डियाक अटॅक आल्याने एका तासातच मृत्यू होऊ शकतो. साधारण हा धोका हा वय जर २५ वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. तसेच आजकाल कोविड ची स्थिती निर्माण झाल्याने हृदयाच्या समस्या या जास्त वाढू लागल्या आहेत. अचानक हृदयात त्रास हा जाणवू लागला किंवा जर छातीत दुखू लागले असता , हार्ट अटॅक येऊ शकतो.
साधरणपणे ४५ % तरुण पिढी हि व्यसनाच्या आहारी गेलेली आहे . मद्यपान , ध्रुमपान अश्या सवयी जडल्या गेल्या आहेत . अल्कोहोलचे सेवन जास्त असल्याने त्यांच्या प्रतिकार शक्तीत वाढ हि कमी झाली आहे . त्यामुळे हृदयाच्या समस्या या वाढत आहेत. हृद्य हे व्यवस्थित राहण्यासाठी आहारात योग्य पदार्थाबरोबर योग्य प्रकारचा व्यायाम असणे आवश्यक आहे . तसेच कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेतले जाऊ नाही . त्यामुळे डोक्यावर ताण हा जास्त येणार नाही . याची काळजी हि घेतली गेली पाहिजे .