आरोग्यासाठी मसाज का आहे आवश्यक
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्याकडे अगदी लहान बाळांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना मसाज करणे आवश्यक आहे. लहान बाळ ज्यावेळी जन्मले जाते त्याच वेळेपासून त्याच्या शरीराची मालिश हि केली जाते. मालिश केल्याने मुलांची हाडे हि मजबूत होण्यास मदत होते. पूर्वीच्या काळापासून मसाज ला खूप महत्व आहे. आजकाल अनेक ठिकाणी मसाज सेंटर उघडले गेले आहेत. जर आपण ग्रामीण भागात राहत असेल तर त्यावेळी आपल्या शरीराची हालचाल हि काही प्रमाणात का होईना दिसते. पण जर आपण शहरी भागात राहत असू तर त्यावेळी शरीराची हालचाल हि जास्त दिसत नाही. त्यामुळे मसाज हा का आवश्यक आहे ? ते जाणून घेऊया ….
आपले शरीर अनेक स्नायूंनी बनलेले आहे ते स्नायू मोकळे करण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते. त्याच बरोबर मालिश ही सुद्धा तितकीच गरजेची गोष्ट आहे . लहान मुलांची मालिश केल्यानंतर मुलांची वाढ हि लवकर होण्यास मदत होऊ शकते. अनेक वेळा आपण पहिले आहे कि , जे मोठ्या प्रमाणातले आजार आहेत ते दूर करण्यासाठी मालिश हि केलीच जाते. कारण मालिश केल्याने लहान मुलांच्या हाता पायांची वाढ हि लवकर होते. तसेच मोठ्या लोकांचे जे काही हाडांचे प्रॉब्लेम असतील तर ते दूर करण्यासाठी सुद्धा मालिश ची मदत होते. त्याच पद्धतीने मोठे मोठे आजार सुद्धा दूर होतात.अर्धांगवायू सारखे आजर तर ऍलोपॅथिक औषधाने बरे होतच नाहीत त्यांना मसाज व निसर्गोपचार आणि थोडी मेहनत पूर्णपणे आजार दूर करू शकते .
शरीराची मालिश करणे म्हणजे आपल्या स्नायूंना बळकटी देण्यास मदत होते. आपल्या शरीराच्या इतर भागांना सुद्धा यामुळे खूप मदत होते. मालिश केल्याने हाडे लवकर बरी होतात. तसेच ज्या भागाचे दुखणे हे वाढत जात असेल तर त्या भागाचे दुखणे हे कमी होण्यास मदत होऊ शकते. मालिश केल्याने खूप चांगली अशी झोप लागते. रक्ताला स्वच्छ करण्यास मालिश हे मदत करते.