बटाटे हिरवे का होतात..? ते खाणे सुरक्षित आहे का..?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। बटाटा अशी भाजी आहे जी कोणत्याही भाजीसोबत मिसळली तर त्या भाजीची चव वाढते. त्यामुळे बटाटा सर्रास कोणत्याही घरात हा आढळतोच. पण अनेकदा बाजारातून आणलेले बटाटे लवकर शिजत नाहीत. याचे कारण अनेकदा त्या बटाट्याचे हिरवे असणे वा कोंब येणे असे सांगितले जाते. त्यामुळे बटाटे विकत घेतानाच सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
कारण बटाटा शिजत नाही हे नसून असे बटाटे आरोग्यासाठी हानिकारक असतात हे आहे. हि बाब तज्ञांनी संशोधनातून सिद्ध केली आहे. तज्ञांच्या मते, हिरवे दिसणाऱ्या बटाट्यांमध्ये विषारी संयुगाची उच्च पातळी असते. त्यामुळे असे बटाटे आरोग्याची हानी करू शकतात. आज आपण बटाटे हिरवे का होतात आणि ते खाणे सुरक्षित आहे का..? हे जाणून घेऊया.
० बटाटे हिरवे का पडतात..?
तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, बटाटे थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने त्याचा रंग हिरवा होतो. हा हिरवा रंग क्लोरोफिलपासून येतो. प्रकाश संश्लेषणासाठी म्हणजेच फोटोसिंथेसिससाठी क्लोरोफिल खूप आवश्यक आहे.
ही अशी प्रक्रिया आहे जी झाडे स्वतःला पोसण्यासाठी वा अन्न देण्यासाठी वापरतात. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे बटाट्यांमधील क्लोरोफिलच्या उत्पादनास गती मिळते आणि यामुळे त्यांना पुन्हा एका अंधाऱ्या खोलीत स्टोर करून ठेवावे लागते.
० हिरवे बटाटे खाणे सुरक्षित आहे का..?
आहार तज्ञांच्या मते, हिरवे बटाटे आरोग्याच्या दृष्टीने खाण्यायोग्य नसतात. यामुळे मळमळ, अतिसार यासारख्या पचनसंबंधित समस्या होऊ शकतात. अगदी सोप्प्या पद्धतीने जाणून घ्यायचे असेल तर एक नियम आहे.
शिजवलेल्या बटाट्याची चव कडू असेल तर ते बटाटे हिरवे आणि खाण्यास सुरक्षित नाहीत. कारण हिरव्या बटाट्यामध्ये सोलनिन हे संयुग असते. ज्यामुळे बटाटा कडू लागतो आणि आरोग्याच्या अनेक समस्याही वाढवू शकतो.
० मोड आलेले बटाटे खाणे सुरक्षित आहे का..?
मोड आलेल्या बटाट्यांचं सेवन करणे देखील आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक असते. दरम्यान भरपूर दिवस बटाटे ठेवल्यामुळे त्यांना मोड आले असल्यास अशा बटाट्यांचे सेवन करू नये. कारण असे बटाटे नर्व्हस सिस्टमसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे पुढच्या वेळी बटाटे विकत घेताना वरील काळजी नक्की घ्या.