अंघोळीसाठी गरम पाणीच का वापरावे ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपण अंघोळीसाठी गरम पाण्याचाच वापर का केला जातो. गरम पाण्याच्या साह्याने आपण आपला मूड खूप चांगला करत जातो. अंघोळीसाठी जर आपण थंड पाण्याचा वापर जर केला तर मात्र आपला आळस हा कमी होत नाही. जगभरातील अनेक लोक दररोज सकाळी फ्रेश होण्यासाठी आणि अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात. अनेक ठिकाणी अंघोळीसाठी थंड पाण्याचा सुद्धा वापर केला जातो. पण आरोग्यासाठी थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचा का वापर केला पाहिजे ते जाणून घेऊया …..
आपले जर आरोग्य हे व्यवस्थित राहायचे असेल तर त्यासाठी आपल्या शरीराची स्वच्छता सुद्धा असणे गरजेचे आहे. आपल्या आहारात खाण्या – पिण्याच्या सवयी या चांगल्या असल्या पाहिजेत . आरोग्यदायी वातावरण, सकस आहार, व्यायाम आणि स्वच्छतेच्या सवयी अशी काही कारणे आहेत. याखेरीज नियमित गरम पाण्याने स्नान करण्याचाही हा परिणाम आहे, असे मानले जात आहे. भारतात तर सगळीकडे अंघोळ करणे म्हणजे नवीन दिवसांची नवीन सुरुवात असे मानले जाते. भारतीय संस्कृतीत गरम पाणी एक अंघोळ हे समीकरण खूप चांगल्या रीतीने तयार झाले आहे.
गरम पाण्याच्या नैसर्गिक स्रोतामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. जपान मध्ये जवळपास २७ हजार नैसर्गिक स्रोत आहेत कि ,त्याचा वापर केल्याने आपल्या शरीराला खूप फायदा हा होतो. प्रदूषणामुळे शरीरावर होणारे परिणाम दूर करण्यासाठी गरम पाण्याने केलेले स्नान उपयुक्त आहे. थंडीच्या दिवसांत तर गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर सर्दी , खोकला ताप अश्या समस्यांना सामोरे जायला लागू शकत नाही. जर तुम्हाला अंगदुखीच्या समस्या या जास्त प्रमाणात असतील तर त्यावेळी गरम पाण्याच्या साह्याने शरीराला चांगल्या पद्धतीने शेक देऊ शकता त्यामुळे अंगदुखी कमी प्रमाणात जाणवू शकेल. उन्हाळा किंवा थंडीचे दिवस बाधले जाऊ नये म्हणून गरम पाण्याचा वापर हा केला जावा.