या घरगुती उपायांच्या मदतीने करू शकता सर्दी दूर
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजूबाजूच्या वातावरणामध्ये बदल झाला तर आपल्याला सर्दी , खोकला यासारख्या समस्या जास्त जाणवतात. सर्दी खोकला हे जरी साधारण आजार वाटत असतील तरी आत्ता कोरोनाच्या काळात छोट्या छोट्या आजारांपासून सावध राहणे आवश्यक आहे. सर्दी , खोकला म्हणजे वातावरणात झालेले बद्धल आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर दिसून येतो. पण अश्या साध्या आजारांसाठी घरगुती उपाय करणे हे आवश्यक आहेत . ते कोणते ते माहित करूयात …
— दूध आणि हळद
हळद हि आयुर्वेदीक गुणधर्मानी परिपूर्ण आहे . त्याचा वापर हा दररोज च्या भाज्यांमध्ये सुद्धा केला जातो. त्याच्यामध्ये असलेले अँटीबॅक्टरील गुणधर्म हे आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्तीत वाढ करण्यास मदत करते. गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळदीमध्ये असलेले गुणधर्म हे आपल्याला खोकल्यापासून आणि सर्दीपासून संरक्षण करण्याचे काम करते.
— आल्याचा चहा
आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं. आल्याचा चहा हा सकाळी सकाळी प्यावा.
— लिंबू आणि मध
लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्तीत वाढ करण्याचे काम करते.
— लसूण
लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या. असं एक-दोन वेळ्या केल्यानं आराम मिळतो. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसून झपाट्यानं दूर करतं.