शरीराच्या आरोग्यासाठी ‘यल्लो फूड’ फायदेशीर; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे. या हंगामात विविध फळे आणि भाज्या मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध होतात. त्यामुळे या हंगामात आपल्या आहाराचे योग्य नियोजन केल्यास अतिशय लाभ होतो. पण आहारतज्ज्ञ सांगतात कि, हिवाळ्याच्या दिवसात शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी यल्लो फूड अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या आहारात अश्या पदार्थांचा समावेश जरूर करावा. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि यल्लो फूड म्हणजे काय? तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि यल्लो फूड म्हणजे पिवळ्या रंगाचे पदार्थ. होय. इतकी सोप्पी संज्ञा आहे यल्लो फूडची. चला तर जाणून घेऊयात यल्लो फुडम्ह्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो ते खालीलप्रमाणे:-
१) पिवळी ढोबळी मिरची – ढोबळी मिरची अर्थातच सिमला मिरची. आपण बाजारात अनेकदा हिरव्या, लाल आणि पिवळ्या अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये सिमला मिरची पहिली असेल. आजकाल सर्व लहान मोठ्या बाजारांमध्ये या कलरफुल सिमला मिरचीचे प्रकार उपलब्ध आहेत. यातील पिवळ्या सिमला मिरचीत मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट असतात. तसेच पिवळ्या सिमला मिरचीत शरीराला आवश्यक व्हिटॅमिन आणि खनिजं आहेत. त्यामुळे हि सिमला मिरची केवळ रंगली वेगळी म्हणून खाणे टाळू नका तर आवर्जून खा.
२) लिंबू – आपण अनेकदा साधारण हिरव्या रंगाचे कच्चे लिंबू घेणे पसंत करतो. पण मित्रांनो पिवळ्या रंगाच्या लिंबातून आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन सी मिळते. शिवाय यात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. तसेच सायट्रिक अॅसिडदेखील असते. पिवळ्या लिंबाच्या सालीचा रस त्वचेला चोळल्यास त्वचेवरील अनेक डाग दूर होण्यास मदतही होते. तर या लिंबाची फोड सालासकट पाण्यात टाकून ते पाणी उकळवून निम्मे करून प्यायल्यास वजन कमी होण्यासाठी मदत होते. याशिवाय लिंबाचा रस मर्यादीत प्रमाणात सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
३) मका – पावसाळ्यापासूनच मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यामुळे बाजारात भरपूर मके पाहायला मिळतात. मका खाणे शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. कारण शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मका सहाय्यक ठरतो. तसेच व्हिटॅमिन बी, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी ५ मिळवण्यासाठी मका उपयुक्त आहे.
४) केळी – पिवळ्या रंगाच्या केळ्यामधून व्हिटॅमिन ए, बी, सी, ई याशिवाय झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक मिळतात. त्यामुळे पिवळी केली खाणे शरीरासाठी लाभदायक आहे. मात्र लठ्ठपणा वा मधुमेहाचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या परवानगीशिवाय केळ्याला हातसुद्धा लावू नका.
५) अननस – अननस आतून पिवळ्या रंगाचे असते हे आपण सारेच जाणतो. या फळातून शरीराला पोटॅशियम तसेच इतर उपयुक्त एंजाइम्स मिळतात. शरीराला आलेली अनावश्यक सूज कमी करण्यासाठी अननस खाणे फायदेशीर आहे. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अननस खाणे उपयुक्त आहे.