वॅक्सिग सोडून सुंदर पायांसाठी करू शकता ‘हे’ पण
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपले जर पाय हे सुदंर हवे असतील तर त्यावेळी मात्र आपल्या पायांवर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट कराव्या लागतात . आपल्याला माहित असणाऱ्यांपैकी पायांचे केस काढण्यासाठी नेहमी वॅक्स चाच वापर केला जातो . किंवा जास्तीत जास्त पेडिक्युअर पण केले जाऊ शकते. वॅक्स च्या वापराऐवजी आपण अनेक घरगुती प्रॉडक्ट वापरून आपल्या पायांचे सौदर्य वाढवू शकता . कसे ते जाणून घेऊया …
रुटीनमध्ये पायांसाठी नेहमी ब्रश वापर —
आपल्या पायांसाठी एक्सब्लॉटिंग करण्यापेक्षा नेहमी ब्रशचा वापर करा . म्हणजे तुमच्या शरीरातील रक्तसंचालन होण्यास मदत होऊ शकते . जर मात्र तुमची त्वचा हि जास्त प्रमाणात कोरडी असेल तर मात्र तुम्ही ब्रश करणे टाळले पाहिजे . कारण त्यामुळे कदाचित जास्त प्रमाणात तुमची त्वचा हि कोरडी पडू शकते.
बेकिंग सोडा वापरा—
आपले पाय हे स्वच्छ राहण्यासाठी काही प्रमाणात बेकिंग सोडा वापरा म्हणजे आपल्या त्वचेवरील मृत त्वचा हि नष्ट होण्यास मदत होऊ शकते . एका बदलीमध्ये काही प्रमाणात पाणी घ्या . त्याच्यामध्ये बेकिंग सोडा हा जास्त प्रमाणात टाका . त्यामध्ये लिंबाच्या पाण्याचा वापर हा करू शकतो. काही वेळ आपले पाय हे पाण्यात तसेच टाकून ठेवा. त्यामुळे पाय हे अजून स्वच्छ राहण्यास मदत करते .
होम मेड स्क्रब —-
आपले पाय हे स्वच्छ ठेवण्यासाठी घरच्या घरी स्क्रब तयार करू शकता. घरात वापरताना साखर आणि चहा पावडर याच्या साहयाने स्क्रब तयार करू शकता. त्याच्यामध्ये कोमट नारळाच्या साहयाने हळू हळू पायांवर मालिश करा.
या गोष्टी मात्र अजिबात वापरू नका —
आपल्या पायांसाठी नेहमी मीठ किंवा कोणत्याही पद्धतीचे स्क्रब वापरू नका. त्यामुळे मात्र पायांची आग आग जास्त होऊ शकते.
फाटलेल्या टाचांसाठी —
कोमट पाण्यात लिंबाचा रस हा जास्त प्रमाणात ठेवा .आणि कोमट पाण्यात बराच वेळ आपला पाय टाकून ठेवा . त्याने आपल्या पायांवरील आणि टाचांमधील घाण काढण्यास मदत करू शकते .