पालक हो सावधान! आपल्या मुलांना आत्महत्येची भावना गिळंकृत करू पाहतेय हे कसे ओळखालं?; जाणून घ्या लक्षणे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। नैराश्य एक अशी अवस्था ज्यामध्ये व्यक्ती आपल्या आयुष्यातील अनेको क्षण वाया घालवते. इतकेच काय तर जगणे नकोसे वाटणे आणि माणसांचा सहवास बोचू लागतो. तुम्हाला काय वाटते नैराश्य हे केवळ तारुण्यवस्थेत येते. तर तुम्ही चुकीचे आहात. आजकाल नैराश्याचे प्रमाण सर्वात जास्त शिकार लहान मुले होत आहेत. WHO च्या अहवालानुसार सुमारे ५ करोड लोकं नैराश्याच्या गर्तेमध्ये अत्याधिक लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे भारतात आत्महत्या होण्याचं प्रमाण अधिक आहे. मुळात आत्महत्येस अनेक विविध कारणे असू शकतात. मात्र नैराश्य या समस्येचे मूळ कारण मानले जाते. बहुतेकदा आर्थिकदृष्ट्या खचलेले आणि मानसिकदृष्ट्या एकाकी असलेले लोक आत्महत्या करण्याचा विचार करतात, असे मनोवैज्ञानिक सांगतात.
आपल्याला अनेकदा असे वाटते कि जगात केवळ आपल्याला खूप टेन्शन आहे. पण मित्रांनो, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’. त्यामुळे लहान मुलांचे जगणे सोप्पे आहे असे समजू नका. तुमच्यासारखेच काही ना काही टेन्शन त्या लहानग्यांना सुद्धा असते. कधी अभ्यासाचा ताण, तर कधी एकाकी पडण्याची भीती, न्यूनगंड आणि जगात वावरताना वाटणारे भय हे सर्व काही आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घटकांचा एक भाग आहेत. आजकाल अगदी दहा वर्षाच्या मुलांपासून सोळाव्या वयातील मुलं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मुलांच्या अश्या अनेक समस्या असतात ज्याकडे पालकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांच्या वागण्या बोलण्यात होणारे बदल वेळीच टिपा आणि आपल्या मुलांना वाचवा. आज आपण याच संदर्भातील अशी लक्षणे जाणून घेणार आहोत जी मुलांना नैराश्याकडे ओढतात आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात.
१) आवडत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे – लहान मुलं मुख्य करून आपल्याला जे आवडत तेच करतात. पण जर मूळ त्यांच्या आवडत्या गोष्टींकडे देखील दुर्लक्ष करतील असतील तर यामागील कारण वेळीच जाणून घेणे पालकांची जबाबदारी आहे. कारण हे एक नैराश्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे पालकांनो मूळीच दुर्लक्ष करू नका.
२) जास्त/ कमी झोप किंवा अनिद्रा – अति झोप, कमी झोप किंवा अनिद्रा हि नैराश्याची धोकादायक लक्षणे आहेत. कारण नेहमीच्या सवयीमध्ये बदल करून जर तुमचे अपत्य अति झोपत असेल किंवा कमी झोपत असेल वा झोपतच नसेल तर हे नैराश्याचं लक्षण आहे जे वेळीच समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
३) एकाकी राहणे – जर तुमची मुलं लोकांमध्ये रमत नसतील आणि समवयस्क इतर लहान मुलांसोबत खेळत नसतील तर हि चिंतेची बाब आहे. मुळात एखाद्या व्यक्तीचा स्वभावच असा असेल तर यावर औषध नाही. परंतु एरवी बडबडणारी, मज्जामस्ती करणारी मुलं अचानक शांत आणि एकाकी राहत असतील तर त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढते. याचा थेट त्यांच्या मेंदूवर परिणाम होत असतो.
४) सतत आत्महत्येशी संबंधित विषयांवर चर्चा – नैराश्यापासून दूर राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिक रित्या माणसाचे सक्षम आणि भक्कम असणे गरजेचे आहे. अनेकदा लहान मूळ आपण जे बोलतो आपण जे वागतो तसेच हुबेहूब करतात. कारण आपल्या वागण्या बोलण्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे जर घरामध्ये आत्महत्येशी संबंधित विषयांवर सतत चर्चा होत असेल तर याचा थेट मुलांवर परिणाम होतो. याशिवाय मुलांच्या वाचनात आत्महत्येशी संबंधित लेख किंवा व्यक्ती निगडीत विषय येत असेल तर पालकांनी मूळीच दुर्लक्ष करू नये. त्यांच्याशी बोलून वेळीच या विषयांना दूर सारा.
५) खाण्या/ पिण्यात बदल – माणसाच्या खाण्याच्या सवयींमधून त्याच्या मानसिक स्वास्थ्यबाबत अनेक संकेत मिळतात. लहान मुलं अचानक खूप खात असतील किंवा कमी खात असतील तर त्यांच्या भूकेमध्ये होणारे बदल वेळीच समजून घ्या. नक्कीच त्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यामध्ये समन्वय नसल्याचे संकेत देतात.
६) अभ्यासात अधोगती – तुमचे अपत्य अभ्यासात हुशार असेल किंवा नसेल पण पण अभ्यास करत असेल इतकेच महत्वाचे आहे. आता मुळातच आपल्या मुलांची अभ्यास गती कमी असेल तर फारसे टेन्शन नाही. पण परिक्षेत सतत नापास होणं, सोबत खाण्याच्या सवयी, झोपेच्या सवसवयींनमध्ये बिघाड हे त्यांची मानसिकता स्थिर नसल्याचे संकेत देतात. त्यामुळे मुलांची अभ्यासातील अधोगती लक्षात आल्यास वेळीच मुलांशी प्रेमाने चर्चा करा.
७) भावनिक बदल – नैराश्याची भावना मुलांमधील संवेदनशीलता वाढवते. अगदी लहान सहान गोष्टींवरून आपली मुले लगेच चिडतात किंवा कोणत्याही गोष्टीचा अर्थ स्वतःच्या विरुद्ध लावून ढसाढसा रडू लागतात. एकतर त्यांच्या भावना दुखावल्या जातात किंवा त्यांना राग येतो. हे असे भावनिक बदल होत असतील तर मुलांकडे वेळीच लक्ष द्या.
८) मूड स्विंग – आपली मूळ अचानक शांत होत असतील, रडत असतील, अचानक हायपर होत असतील, रागवत असतील, अचानक अॅक्टिव्ह होऊन पुन्हा कोमेजून जात असतील, सतत एकटे राहत असतील आणि कोणाशीही काहीही बोलत नसतील तर हे मड स्विंग नैराश्याकडे बोट दाखवतात. त्यामुळे आपल्या मुलांच्या बदलत्या मुडकडे लक्ष द्या आणि वेळीच मुलांचे मन वळवा.