रामफळाचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। रामफळ हे एक फळ असून या फळाचे अनेको आरोग्यदायी फायदे आहेत. कारण या फळामध्ये असे काही घटक समाविष्ट आहेत ज्यांमुळे आरोग्याशी संबंधित अनेको तक्रारी दूर करण्यासाठी लाभ होतो. भारतात कित्येक विविध बाजरपेठांमध्ये हे फळ उपलब्ध असते. मात्र तरीही न जाणे कित्येकांनी आजतागायत याची चव चाखली नसेल. मुळात रामफळ आणि सिताफळ या दोन फळांच्या नावातील संभ्रमामुळे अनेकदा रामफळाकडे दुर्लक्ष केले जाते. पण आरोग्याच्यादृष्टीने रामफळ अत्यंत गुणकारी आहे त्यामुळे आजपर्यंत त्याची चव चाखली नसाल तर आता जरूर चाखा. कारण आहार तज्ञ देखील आरोग्यासाठी लाभ व्हावा म्हणून रामफळ खाण्याचा सल्ला देतात.
१) मधूमेहींसाठी गुणकारी – मधूमेह हा एक असा आजार आहे ज्यात न जाणे कित्येक बंधने येतात. त्यात मुख्य करून खाण्यापिण्याच्या गोष्टींवर सुनिश्चित बंधने येतात. अनेकदा तर असे होते कि मधूमेहाने ग्रासलेल्या रुग्णांनी नेमके खावे तरी काय असा त्यांना प्रश्न पडलेला असतो. आहारात ठरलेल्या पदार्थांचा रोज रोज कंटाळा आला कि मग मधल्या वेळेत लागणाऱ्या भूकेवर पर्याय शोधला जातो आणि मधूमेहींसाठी रामफळ हा उत्तम पर्याय आहे. कारण रामफळाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. याच सोबत रामफळात अॅन्टी कॅन्सर क्षमतादेखील आहेत.
२) अॅक्नेचा त्रासावर लाभदायक – वयाची तिशी पार केल्यानंतर अॅडल्ट अॅक्नेचा त्रास संभवतो. या त्रासावर रामफळ उत्तम उपाय आहे. कारण रामफळाच्या सेवनामुळे त्वचेचे आरोग्य सूधारण्यासाठी अतिशय मदत होते.
३) रोगप्रतिकारशक्तीत सुधार – बदलते हवामान आरोग्यास हानी पोहचविण्यास सक्षम असेल तर याचा अर्थ असा कि आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे. त्यामुळे ती सुधारण्यासाठी का होईना रामफळ खाणे फायद्याचे आहे हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. शिवाय रामफळात असलेले व्हिटॅमिन ए, बी हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
४) निर्जीव केसांच्या समस्यांवर प्रभावी – रामफळात व्हिटॅमिन सी समाविष्ट असते. जे फ्री रॅडिकल्सशी सामना करण्याची क्षमता ठेवतात. यामुळे शुष्क आणि निर्जीव केसांची समस्या, अॅक्ने मार्क्स आणि कमजोर सांध्यांना बळकटी मिळते.