cervical cancer
|

हि 5 लक्षणे म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर असण्याची शक्यता; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। फक्त कॅन्सर हा शब्द ऐकला तरीही अनेकांची धाकधूक वाढते. याचे कारण म्हणजे, कॅन्सर हा रोग भयंकर रोगांपैकी एक आहे. जीवावर बेतणाऱ्या या आजाराचे कारण समजले नाही तर उपाय करणे अवघड जाते. अनेकदा हा आजार खूप लेव्हलपर्यंत जातो आणि मग समजतो. अशावेळी कोणतेही उपचार आणि औषधे या आजारावर मात करण्यास सक्षम नसतात. त्यामुळे रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता जास्त असते.

तसे पाहता कॅन्सरचे असंख्य प्रकार आहेत. मात्र महिलांमध्ये सामान्यपणे आढळणारा कॅन्सरचा प्रकार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर. गर्भाशय मुखाचा कॅन्सर होणाऱ्या महिलांचे प्रमाण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचे नेमके कारण समजू शकत नसले तरीही तज्ज्ञांनी काही प्रमुख लक्षण सांगितली आहेत. ज्यामुळे या कॅन्सरच्या प्रकाराचे निदान होते. मात्र निदान होतेवेळी जर उशीर झाला असेल तर रुग्णाचा जीव वाचतोच असे नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या विविध तक्रारींकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण आणि लक्षणे खालीलप्रमाणे:-

० कारण - कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असणे.
आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असेल तर अशा व्यक्तींनी योग्य ती खबरदारी घ्यावी. कारण कॅन्सर हा अनुवंशिक आजार असून तो मागील पिढ्यांकडून पुढच्या पिढ्यांना होत असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे आपल्या घरातील कोणाला कॅन्सर असेल तर आपण कायम सावध राहायला हवे.

लक्षणे :-

१) अनियमित रक्तस्राव –
मासिक पाळीच्या दिवसात रक्तस्राव होण्याशिवाय रक्तस्राव होत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण रक्तस्राव हे गर्भाशयाच्या कॅन्सरचे महत्त्वाचे लक्षण आहे.

२) दिर्घकाळ ओटीपोटात दुखणे –
अनेक दिवसांपासून ओटीपोटात दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण गर्भाशयाच्या पिशवीला सूज येणे, गर्भाशयाच्या पिशवीला गाठ येणे यामुळेदेखील अशी पोटदुखी होते. त्यामुळे दिर्घकाळ ओटीपोटात दुखत असेल तर वेळीच उपाय करा.

३) अपचन आणि शारीरिक थकवा –
अपचन ही आपल्याला सामान्य वाटणारी समस्या असली तरी ती गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये महत्त्वाचे लक्षण आहे. नियमित दगदगीमुळे थकवा येत असेल तर ठीक पण नियमित थकवा असेल तर याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. 

४) अचानक कमीजास्त होणारे वजन –
अचानक आपले वजन खूप कमी किंवा खूप जास्त वाढले तर हेदेखील गर्भाशयाच्या कॅन्सरचे लक्षण आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे हि समस्या लक्षात आल्यास लगेच डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या तपासण्या करुन घ्या.