| |

सप्त आंतरराष्ट्रीय योगा दिन 2021; जाणून घ्या योगदिनाचे विशेष महत्व

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आज दिनांक २१ जुन २०२१ असून दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा योगा दिन हा ७ वा असून हा दिवस नागरिकांना योगाचे महत्त्व आणि आरोग्यासाठी होणारे फायदे याबाबत जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. मात्र आजचा दिवस योगाभ्यासास समर्पित करण्यामागे मोठे कारण आहे. हे कारण काय ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जून २१ हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. मोठा अर्थात पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस अन्य दिवसांपेक्षा थोडा मोठा असतो. कारण २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. परिणामी यादिवशी दिवस मोठा आणि रात्र लहान असते. शिवाय २१ जून रोजी सूर्योदय देखील लवकर होतो आणि सायंकाळी जास्त उशिरापर्यंत उजेड राहतो. त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व प्राप्त होते. म्हणूनच हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगा दिन’ म्हणून साजरा करण्याकरीत पात्र आहे.

भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. म्हणून ‘आंतरराष्ट्रीय योगा दिन’ साजरा करण्यासाथीचा प्रस्ताव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र संघात केले होते. संयुक्त राष्ट्रसंघात दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर केवळ ९० दिवसांत १९३ देशांपैकी १७७ देशांनी ११ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण बहुमताने सहमती दर्शविली. संयुक्त राष्ट्राने यंदाच्या २०२१ आंतरराष्ट्रीय योगा दिनाची थीम ‘बी विथ योगा, बी अॅट होम’ म्हणजेच ‘योगा सह रहा, घरी रहा’ अशी आहे. गतवर्षी २०२० ची थीम ‘घरी राहून योगा करा’ अशी होती. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे भयंकर सावट असल्यामुळे यावर्षीसुद्धा घरी राहून योगाभ्यास करून आरोग्य जपण्यासाठी सर्व स्तरांवर जनजागृती केली जात आहे.