Bad Food For Lungs
| |

Bad Food For Lungs: तुमच्या आहारात ‘हे’ पदार्थ असतील तर, तुमची फुफ्फुसे धोक्यात आहेत; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Bad Food For Lungs मित्रांनो एक साधा सोप्पा प्रश्न आहे. आज तुमच्या जेवणात काय आहे..? वांग्याची भाजी..? किसलेला दोडका..? का मग मस्त लज्जतदार पनीर..? ते काही असो पण तुम्ही जे खाताय ते तुमच्या जीभेइतकंच तुमच्या आरोग्याला आवडतंय का..? असे विचारायचे कारण म्हणजे, आपली जीवनशैली आणि आहार हा आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव करीत असतो. अशावेळी या दोन्ही बाबी उत्तम असणे बंधनकारक आहे, कारण यामुळेच आपल्या आंतरक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. आपण सारेच जाणतो कि नियमित धावपळ आणि दगदगीची दिनचर्या आपल्याला आपल्याच आरोग्याकडे वेळ देऊ देत नाही.

रोजच्या दिनक्रमात आपण घरगुती अन्न कमी आणि बाहेरचे चटपटीत पदार्थ जास्त खातो. यामुळे शरीराला आवश्यक असणारे पोषण पूर्णपणे मिळत नाही. परिणामी शरीराची रोग प्रतिकार शक्ती हळूहळू कमी होऊ लागते आणि आपले शरीर रोग व्याधींचे घर बनू लागते. दरम्यान यकृत, आतडे यांसह फुफ्फुसांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडते. हे शरीराचे अत्यंत महत्वपूर्ण भाग आहेत. ज्यांच्या सक्रिय कार्यप्रणालीमुळे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. पण आपला चुकीचा आहार या अवयवांचे नुकसान करीत असतो. (Bad Food For Lungs)

Bad Food For Lungs

चुकीचा आहार शरीराला पोषण देऊ शकत नाही. यामुळे जेव्हा फुफ्फुस खराब होतात तेव्हा शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळण्याची शक्यता फार कमी होते. म्हणून फुफ्फुसांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी आपण स्वतःच त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. बहुतेकदा फुफ्फुसे अरुंद झाल्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो, असे तज्ञ सांगतात. म्हणूनच त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. (Bad Food For Lungs) यासाठी फुफ्फुसांना धूम्रपान आणि तंबाखू व्यतिरिक्त, प्रक्रिया केलेले मांस, साखरयुक्त पेय आणि अल्कोहोल यांसारख्या पदार्थांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.

० आहार तज्ञ काय म्हणतात..?

Food
(Bad Food For Lungs) आपल्या नियमित दिनचर्येत सकस आहार घेणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच आपली फुफ्फुसे निरोगी राहण्यासाठी आणि नेहमी कार्यशील राहावी याकरिता चुकीचे संयोजन असलेला आहार तसेच निकोटिनयुक्त पदार्थांपासून दूर रहावे. याशिवाय कोणकोणते पदार्थ आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य बिघडवत आहेत हे जाणून घेणे आणि त्यानुसार आपला आहार ठरवणे यावर भर द्यावा. म्हणूनच तज्ञांनी काही पदार्थांबाबत सांगितले आहे. जे पदार्थ फुफ्फुसांचे आरोग्य धोक्यात टाकण्यास कारणीभूत आहे.

० फुफ्फुसांच्या आरोग्याचे नुकसान करणारे पदार्थ
(Bad Food For Lungs)

1. साखर

साखरेचे सेवन करणे हे आरोग्यासाठी कोणत्याही दृष्टीने लाभदायी मानले जात नाही. कारण साखरेचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणे आरोग्यविषयक समस्या वाढविते. यात साखरयुक्त पेये फुफ्फुसासाठी हानिकारक ठरतात.

Caster Sugar

याचे कारण म्हणजे, हे पेय प्यायल्याने प्रौढांमध्ये ब्राँकायटिस होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत साखरयुक्त पेयांचे सेवन टाळण्याचा सल्ला तज्ञ देतात. शिवाय साखरयुक्त पेय पिण्याऐवजी जमेल तेवढे पाणी प्या असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. (Bad Food For Lungs)

2. मीठ

अति मीठ आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे आपण सारेच जाणतो. त्यामुळे मिठाचे सेवन हे नेहमीच मर्यादित प्रमाणात असावे किंवा शक्य तितके कमी असावे असे तज्ञ सांगतात.

Salt

याचे कारण म्हणजे, जेव्हा कोणी जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करीत असेल तेव्हा त्या व्यक्तीस फुफ्फुसाची समस्या उद्भवू शकते. यामुळेच फुफ्फुस निरोगी ठेवायची असतील तर मिठाचे सेवन कमीत कमीत करावे.

3. दुग्धजन्य पदार्थ

(Bad Food For Lungs) शरीरासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निश्चितच आरोग्यदायी भूमिका बजावतात. मात्र दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असले तरी त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरू शकते.

milk food

याचा सर्वात जास्त हानिकारक प्रभाव फुफ्फुसावर होतो. त्यामुळे फुफ्फुसाचे आरोग्य राखायचे असे तर दुग्धजन्य पदार्थांचे अधिक सेवन करणे टाळा असे तज्ञांकडून सांगितले जाते.

4. प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेले मांस हे आरोग्यासाठी मुळातच चांगले मानले जात नाही. तर फुफ्फुसांसाठी चांगले कसे ठरेल..? प्रक्रिया केलेले मांस हे टिकवण्यासाठी नायट्रेट नामक घटकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्यामुळे प्रक्रिया केलेले मांस खाल्ले असता फुफ्फुसांमध्ये जळजळ आणि ताण येण्याची शक्यता बळावते.

Chicken

अशा परिस्थितीत फुफ्फुसांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात येते. म्हणून बेकन, हॅम, डेली मीट आणि सॉसेज इत्यादी प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळावे, असे तज्ञ सांगतात.

5. मद्य सेवन

मद्य अर्थात अल्कोहोलचे सेवन करणे हे फुफ्फुसासाठी हानिकारक असते. यात असलेले सल्फाइट्स दम्याची लक्षणे वाढवतात. शिवाय अल्कोहोलमध्ये इथेनॉलदेखील मोठ्या प्रमाणात असते. हा घटक फुफ्फुसांना नुकसान पोहोचवू शकतो.

Alcohol

ज्यामुळे फुफ्फुसांची हानी होते आणि फुफ्फुसे अकार्यक्षम होतात. अशा परिस्थितीत, कमी असो वा जास्त मद्यपान हे टाळलेच पाहिजे. (Bad Food For Lungs)

‘हे’ पण वाचा:-

एक सिगारेट शरीराला आतून जाळत आयुष्याचा करते धूर; जाणून घ्या परिणाम

काय सांगता !!! तुमच्या आहारात आहेत ‘हे’ पदार्थ मग 100% होणार हृदयरोग अन् किडनी प्रॉब्लेम