| |

एक सिगारेट शरीराला आतून जाळत आयुष्याचा करते धूर; जाणून घ्या परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्यापैकी कित्येक लोक अशी आहेत जी ‘ऐकावे जनाचे पण करावे मनाचे’ या तत्त्वावर ठाम असतात. फक्त हे तत्त्व कुठे वापरायचे हे त्यांना समजत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून सिगारेट ओढणे हि बाब काहींसाठी छंद, आवड, गरज आणि दिखावा इतक्यापुरता मर्यादित आहे. या लोकांना असे वाटत असते कि हे सिगारेट ओढून ती जाळत हळू हळू संपवतात. किती हास्यास्पद आहे हि कल्पना. कारण मुळात हे सिगारेट जाळत नाहीत. तर, सिगारेट यांना आतून हळूहळू जाळत असते आणि अखेर आयुष्याचा अंतसुद्धा करते.

तज्ञ सांगतात कि, एक मध्यम आकाराची सिगारेट व्यक्तीच्या आयुष्यातील जवळपास ६ ते ७ मिनिटे एकावेळी कमी करते. याचे कारण म्हणजे, सिगारेटमध्ये निकोटिन, टार, आर्सेनिक आणि कॅडमियमसह चार हजार हानिकारक तत्व समाविष्ट असतात. याशिवाय वायु प्रदूषण, चूल आणि कंपन्यांच्या चिमण्यांचा धुरसुद्धा आपल्या फुफ्फुसाचे नुकसान करतो. परिणामी COPD (chronic inflammatory lung disease) सारखा गंभीर आजार होतो आणि माणसाचे आयुष्य एका झटक्यात कमी होते.

भारतात मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण सीओपीडी आहे. लोकांमध्ये याबाबत जागरूकता नसल्यामुळे या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सिगारेटच्या पाकिटावर अगदी मोठ्या अक्षरात ती आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे नमूद केलेले असते. शिवाय अनेक संस्था याबाबत सतत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. एखादा चित्रपट सुरु होण्यापूर्वीदेखील स्क्रीनवर सिगारेट, पान, तंबाखू किती हानिकारक आहे हे सांगितले जाते. मात्र तरीही लोक याकडे काना डोळा करतात आणि आपल्या आयुष्याचा एक एक मिनिट कमी करू लागतात.

० COPD – सीओपीडीची कारणे आणि लक्षणे

१) धुळ – धूम्रपान.

२) गलिच्छ वातावरण.

३) श्वास घेण्यास त्रास.

४) वारंवार खोकला – कफ.

५) फुफ्फुसे प्रसरण – आकुंचन होण्याची अक्षमता.

६) श्वसन नलिकेत सूज.

७) सतत घाबरल्यासारखे वाटणे.

८) श्वास घेतल्यानंतर शिटीसारखा आवाज येणे.

९) छातीत आखडणे.

१०) एसीमध्येही घाम येणे.