After Meal Water
| | |

Walking After Meals Benefits : नियमित जेवणानंतर ‘हे’ काम करा आणि लठ्ठपणा दूर करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Walking After Meals Benefits दगदगीचे जीवन आणि धावती पळती दिनचर्या यामुळे आरोग्याकडे वेळ द्यायला कुणाकुणाकडे लक्ष नाही. काहीही आणि कधीही खाण्याच्या सवयीने तर शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यदेखील बिघडवले आहे. यामुळे सतत चिडचिड रोजच्या जीवनाचा भाग झाली आहे. याशिवाय लठ्ठपणा.. हि समस्या तर बहुतेक १०० पैकी ९९ लोकांमध्ये सर्रास दिसून येतेय. लठ्ठ असणे पाप नसले तरीही यामुळे जीवन शाप वाटू लागते त्याचे काय..?

Weight gain

अनेकदा आरोग्यविषयक समस्यांमुळे वाढणारे वजन हे काही केल्या कमीच होत नाही. अशावेळी काहीही करा वजन आटोक्यात येण्याचं नावचं घेत नाही. म्हणून आम्ही सांगू कि, ते कमी होत नसेल तर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा. जसजसं वजन नियंत्रणात येईल आपोआप लठ्ठपणा दूर होईल. तर यासाठी काय करायचे हे आज आपण जाणून घेऊ. (Walking After Meals Benefits)

पिक्चरमध्ये दिसणाऱ्या हिरो – हिरोईनची बॉडी जितकी आकर्षक, मादक आणि लक्षवेधी असते तितकेच लक्षवेधी आपणही असावे असे वाटणे साहजिक आहे. म्हणूनच अनेक लोक तासनतास जिममध्ये अंग मेहनत करताना दिसतात. याशिवाय बाजारात उपलब्ध असणारी महागडी औषधे देखील घेतली जातात. पण याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

Exercise

म्हणून तासनतास जिम करणे किंवा वजन कमी करण्यासाठी औषधे खाणे यापेक्षा दैनंदिन जीवनशैलीत काही चांगल्या सवयीचा समावेश करा. जसे कि, नियमित जेवणानंतर चालणे. हि एक अतिशय उत्तम आणि निरोगी सवय आहे. या सवयीमुळे एकतर खाल्लेले अन्न अगदी सहज पचते आणि यामुळे शरीरावर अन्नाचा ताण येत नाही. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते. (Walking After Meals Benefits)

मित्रांनो वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. काहीजण बराचवेळ बसून राहतात. पण या दोन्ही सवयीनमुळे शरीराची हालचाल तात्पुरती पूर्ण बंद होते. त्यामुळे तुमची ही एक सवय तुमच्या आरोग्याला अनेक हानी पोहोचवून शरीरातील अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

यात प्रामुख्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत एखाद्या मधुमेहाच्या रुग्णाचे आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकते. याकरिता जेवण झाल्यावर किमान १५ ते २० मिनिटे चालणे फायदेशीर ठरते. कारण चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे वजनही नियंत्रित ठेवणे सोप्पे जाते. जर अजूनही विश्वास बसत नसेल तर खालील फायदे लगेच जाणून घ्या.

Walking after meal

० रात्रीच्या जेवणानंतर चालण्याचे फायदे (Walking After Meals Benefits)

जेवून झाल्यानंतर चालल्याने शरीराची चयापचय क्रिया मजबूत होते. यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. परिणामी संपूर्ण दिवस उत्साही आणि आनंदी जातो.

जेवल्यानंतर पचनक्रिया मंद होते. त्यामुळे चालणे आवश्यक आहे. यामुळे पचनक्रिया गतिमान होऊन अन्न लवकर पचते. यामुळे पचनक्रिया सक्रिय आणि सुरक्षित देखील राहते. (Walking After Meals Benefits)

Digestion

नियमित जेवल्यानंतर सुमारे १५ ते ३० मिनिटे चालणे वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय सोपा मार्ग मानला जातो. एकतर यामुळे पचन व्यवस्थित होते आणि यामुळे शरीरात मेद जमा होत नाहीत. शिवाय बॉडी स्ट्रेसफ्री राहते.

(Walking After Meals Benefits) जेवल्यानंतर चालल्याने पोटाशी संबंधित कोणत्याही समस्येवर मात करणे सोपे होते. यात विशेष म्हणजे पोटफुगी, गॅस होणे आणि बद्धकोष्ठता असे त्रास होत नाहीत.

Diabetes

जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी मधुमेह प्रकार २’चा धोका कमी होतो.

जेवल्यानंतर चालण्याची सवय एकदा शरीराला लागली कि नियमित आपल्या क्षमतेनुसार त्याचा वेळ वाढवावा. यामुळे दिवसभरात जरी व्यायामाला वेळ मिळाला नाही तरी यावेळेत व्यायाम होतो. यामुळे स्नायू मोकळे होतात आणि शरीराचे इतर भाग सक्रिय होतात. (Walking After Meals Benefits)

Blood

खाल्ल्यानंतर चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण अतिशय व्यवस्थित होते. यामुळे शरीराच्या प्रत्येक भागात रक्तपुरवठा व्यवस्थित होतो.

अन्न खाल्ल्यानंतर चालल्याने स्नायूंमधला ताण दूर होते. परिणामी क्षीण कमी होऊन ताण तणाव कमी झाल्याची भावना निर्माण होते. यामूळे झोपदेखील व्यवस्थित लागते.

Waling After Meal

० जेवल्यानंतर तुम्ही किती वेळ चालू शकता..?

दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे चालायलाच पाहिजे. मात्र चालताना एक लक्षात ठेवा आपल्या शरीराला झेपेल त्याप्रमाणे चालण्याचा वेग असावा. फार भरभर चालणे देखील अपायकारक ठरू शकते. शिवाय जेवल्यानंतर खूप चालायचे असाही काही नियम नाही. मात्र तासभर चाललात तरीही काही त्रास होत नाही. (Walking After Meals Benefits)

‘हे’ पण वाचा :-

Cumin Water For Weight Loss जिऱ्याच्या पाण्याने वेटलॉस करताय..? तर ‘या’ गोष्टींचे पालन जरूर करा; जाणून घ्या

पांढऱ्या भोपळ्याचा रस तेजीत करेल वजनात घट; जाणून घ्या फायदे