| | | |

पांढऱ्या भोपळ्याचा रस तेजीत करेल वजनात घट; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन| मित्रांनो तुम्ही दैनंदिन जीवनात कोणकोणत्या प्रकारचा आहार घेता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. कारण आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक घटकांवर होत असतो. त्यामुळे वजन खूप वाढणे वा झपाट्याने कमी होणे या दोन्ही गोष्टी आपण काय खातो यावर आधारित आहे हे समजून घ्या. त्यामुळे वजन वाढल म्हणून किंवा कमी झालं म्हणून वैतागू नका तर आपल्या आहारात बदल करा. आजकाल वजन झपाट्याने वाढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खूप व्यायाम करत असलात तरीही आहारात पांढऱ्या भोपळ्याचा रस जरूर घ्या. यामुळे झपाट्याने वाढलेले वजन झपाट्याने कमी देखील होते.

भोपळ्याच्या रसामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम सारखी अनेक प्रकारची खनिजे आणि जीवनसत्त्वे ए, सी, ई सारखी जीवनसत्त्वे असतात. याव्यतिरिक्त त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्समध्ये देखील भरपूर असतात. तसेच फायबर, विविध प्रकारचे पोषक घटक आणि चयापचय वाढवून वजन वेगाने कमी करणारे घटकदेखील यात समाविष्ट असतात. त्यामुळे आरोग्याला याचे अनेक फायदे होतात.
ते फायदे कोणते हे आपण जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

० कसा बनवालं पांढऱ्या भोपळ्याचा रस..?

पांढऱ्या भोपळ्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये थोडे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, काळी मिरी पावडर आणि चवीपुरते मीठ घालून मिक्स करा. आता ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या. सोबत दोन छोट्या वेलचीची पावडर करून रसात मिसळा आणि गोड चवीसाठी मधाचा वापर करा. हा रस आठवडाभर सकाळी रिकाम्या पोटी प्या.

० पांढऱ्या भोपळ्याचा रस पिण्याचे फायदे

Immunity

१) संसर्गापासून बचाव
कोणत्याही संसर्गजन्य आजारांपासून दूर राहायचे असेल तर पांढऱ्या भोपळ्याचा रस जरूर प्या. कारण या रसातील घटक आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करतात. परिणामी कोणताही आजार आपल्याला सहज होऊ शकत नाही.

२) पुरुषांसाठी लाभदायी
पुरुषांनी कच्चा भोपळा, शिजवलेला भोपळा, भोपळ्याच्या बिया, दाणे, रस प्यावा. कर्ण पांढऱ्या भोपळ्यात कॅरोटीनोइड्स आणि झिंक असते. यामुळे पुरुषांचा प्रोस्टेट कर्करोग होण्यापासून बचाव होतो. झाल्यास प्रोस्टेट वाढण्याचा धोका कमी होतो. 

Eye Number

३) डोळ्याच्या समस्या
पांढऱ्या भोपळ्यातील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या कोणत्याही समस्यांपासून बचाव करण्यास सहाय्यक आहे. यामुळे नियमित भोपळ्याचा रस प्यायल्याने पेप्टिक अल्सर, पचन समस्यांवर फायदा मिळतो. तसेच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट निरोगी राहते.

Skin

४) त्वचेसाठी फायदेशीर
ज्या लोकांची त्वचा तेलकट आणि कोरडी आहे त्यांनी पांढऱ्या भोपळ्याचा रस पिणे कधीही फायदेशीर. कारण पांढऱ्या भोपळ्याच्या रसात अँटी-एक्ने, अँटी-एजिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे अकाली वृद्धत्व येत नाही.

Beautiful Face

५) नैसर्गिक एक्सफोलिएटर – पांढऱ्या भोपळ्याचा रस नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करतो. हा रस त्वचेच्या खालच्या थरावरील जुन्या पेशी काढून नवीन पेशी निर्माण होण्यास मदत करतो.

Weight Loss

६) वाढते वजन
पांढऱ्या भोपळ्याच्या रसात फायबरची मात्रा मोठी असते. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि परिणामी झपाट्याने वाढत असलेले वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.