Air Pollution | सावधान! वायू प्रदूषणामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Air Pollution | मित्रांनो आजकाल वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. आणि यामुळे मानवी जीवन तसेच पशुपक्षी यांच्या सगळ्यांच्या जीवनावर या वायू प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. वायु प्रदूषणाचा सगळ्यात मोठा परिणाम हा मानवाच्या फुफ्फुसावर होतो. परंतु तितकाच परिणाम मानवाच्या हृदयावर देखील होतो. आणि माणसासाठी ते घातक ठरू शकते. सध्या दिल्लीमध्ये वायू प्रदूषण एवढे वाढले आहे की, ते जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये आले आहे.
आपण जर या हवेच्या संपर्कात राहिलो आणि ऑक्सिजन घेत राहिलो, तर या प्रदूषकांमुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. अशी माहिती फोर्टिस हॉस्पिटलचे कॉरिओलॉजी विभागाचे संचालक डॉक्टर संजय कुमार यांनी सांगितले आहे. आता त्यांनी नक्की काय सांगितले आह. कशाप्रकारे हृदयविकारासाठी येऊ शकतो. याची सविस्तर माहिती आपण पाहूया.
प्रदूषण हृदयविकाराचे कारण कसे बनू शकते? | Air Pollution
डॉ.संजय कुमार म्हणाले की, वायू प्रदूषणाची मुख्य कारणे पीएम 2.5, पीएम 10, ओझोन, नायट्रिक ऑक्साईड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड आहेत. अलीकडेच डब्ल्यूएचओ आणि सीडीसी, यूएसए यांनी केलेल्या अभ्यासात वायू प्रदूषणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
पीएम २.५ ची वाढती पातळी हे त्यामागचे सर्वात मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. PM 2.5 ची सामान्य पातळी 10 असते, परंतु भारतात ती 100-500 च्या दरम्यान आढळते. वाढते प्रदूषण किती धोकादायक आहे हे यावरून समजू शकते की 10 मायक्रो ग्रॅम पीएम 2.5 प्रति मीटरने वाढल्यास हृदयविकाराचा धोका 10% वाढतो.
डब्ल्यूएचओच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, वाढत्या वायू प्रदूषणामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका देखील वाढतो, जे हृदय अपयश आणि कार्डियाक अरेस्टचे सर्वात मोठे कारण आहेत.
त्यामुळे हृदयविकाराचे प्रमुख कारण हवेचे प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट होते. प्रदूषणाचे दुष्परिणाम पूर्णपणे नाहीसे करता येणार नाहीत, पण त्याचे दुष्परिणाम नक्कीच कमी होऊ शकतात. प्रदूषणाच्या प्रकोपापासून आपण स्वतःचे कसे रक्षण करू शकतो ते जाणून घेऊया.
PM 2.5 अतिशय सूक्ष्म असतात, ज्यापासून सर्जिकल मास्क किंवा कापडाचा मुखवटा संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करू नका. त्याऐवजी N95 मास्क वापरा. याचा वापर करून तुम्ही PM 2.5 पासून 95 टक्क्यांपर्यंत स्वतःचे संरक्षण करू शकता.
- हेपा फिल्टरचा वापर केल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे तुमच्या घरांमध्ये HEPA फिल्टर्स असलेल्या एअर प्युरिफायरचा वापर करा.
- विनाकारण घराबाहेर पडू नका, घरातच राहा. वाढत्या प्रदूषणामुळे विनाकारण घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आत्ता कुठेही बाहेर न जाण्याचा प्रयत्न करा. गरज असेल तेव्हाच बाहेर जा.
- बाहेर व्यायाम करू नका. चालणे, धावणे किंवा योगासने करण्यासाठी बाहेर पडू नका. स्वतःच्या घरात व्यायाम करा. प्रदूषणात बाहेर व्यायाम केल्याने चांगल्यापेक्षा जास्त नुकसान होईल.