| | |

मानसिकरित्या सुदृढ राहण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा आपण आपला आहार निवडताना शारीरिक आरोग्याची काळजी तर घेतो पण मानसिक आरोग्याची काळजी कोण घेणार..? त्यामुळे आम्ही आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याकरिता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही खास गोष्टी. ज्यामुळे तुम्ही आहारात काही लहान सहन बदल करून मानसिकरित्या सुदृढ आणि निरोगी राहू शकता.

१) मासे – सर्व साधारणपणे माश्यांना ‘ब्रेन फूड’ असे म्हणतात. कारण माश्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड असते. जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शिवाय ते आपल्या शरीरातील नकारात्मक आणि ताणतणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी करण्यास मदत करते.

२) दही – दह्याचे सेवन केल्याने शरीरातील अनावश्यक गर्मी कमी होते. अनेक लोक प्रो बियोटिक्ससाठी दही खातात. तर काही अहवालनुसार पोटांच्या आतड्यांचा आणि मेंदूचा सखोल संबंध असल्यामुळे दही खाल्ल्यास तणाव आणि अस्वस्थता कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते.

३) मध – मध हे शारीरिक आणि मानसिक अश्या दोन्ही स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे. कारण मधाचे सेवन केल्याने शरीरातील शुगरचे प्रमाण संतुलित राहते. तसेच मधाच्या सेवनामुळे बौद्धिक चालनेस गती येते.

४) बेरी – दैनंदिन न्याहारीमध्ये स्ट्रॉबेरी,ब्लूबेरी किंवा ब्लॅकबेरी या फळांचा समावेश असावा. या फळांचे सेवन केल्याने शरीरातील पेशी मजबुत होतात आणि पोटातील जळजळ कमी होते. याचबरोबर चिंता व नैराश्य दूर होते.

५) चॉकलेट – अनेक तज्ज्ञांच्या अभ्यासातून असे समोर आले आहे कि, चॉकलेट खाल्ल्याने शरीरात कॉर्टिसोल ( तणाव कमी करणाऱ्या हार्मोन्सपैकी एक हार्मोन) संतुलित राहते. त्यासोबतच चॉकलेट थकवा कमी करण्यासही मदत करते. शिवाय चॉकलेट खाणे कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींसाठीही फायदेशीर आहे.

६) संपूर्ण धान्य – संपूर्ण धान्य अर्थात ज्यामध्ये ज्वारी, तांदूळ, गहू अश्या धान्यांचा समावेश असेल असे पदार्थ खाणे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर असते. या पदार्थांपासून ट्रिपटोफन नावाचे एमिनो एसिड तयार होऊन शरीरात ऊर्जेचा एक चांगला स्त्रोत तयार होती आणि शरीरात फील-गुड हार्मोन सेरोटोनिन तयार करण्यास मदत होते. यामुळे मनःस्थिती सुधारते आणि झोपेची चक्रही सुधारतात.

७) अक्रोड – अक्रोड हे फळ मेंदूच्या रचनेसारखे दिसते आणि हेच अक्रोड मेंदूला चालना देण्याचेही काम करते. अक्रोड हे अँटीऑक्सिडंट्सचे भंडार असून मेंदूच्या नवीन पेशी बनवण्यास व त्यांना उत्तेजित करण्यास मदत करते. ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य उत्तम राहते.

८) हिरव्या ताज्या पालेभाज्यांचे सेवन – न्यूरोलॉजी या सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार ताजा पालक आणि इतर अन्य हिरव्या ताज्या भाज्यांचे सेवन करणार्‍या लोकांमध्ये संज्ञानात्मक घट कमी होत आहे. यामुळे मनोबल वाढते व मानसिक स्थैर्य प्राप्त होते.

९) टॉमेटो – टॉमेटोमध्ये लायकोपीन नामक अन्टिऑक्सिडेंट असते. जे ताणतणाव दूर करून आपलं डोकं शांत ठेवण्यास मदत करते. शिवाय दररोजच्या जेवणातही टॉमेटो खाल्ल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

१०) सोयाबीन – सोयाबीन हे फायबर आणि अँटी ऑक्सिडेंट्ससह परिपूर्ण आहार आहे. याचे सेवन केल्याने आपल्या रक्तातील साखर स्थिर राहते आणि शारीरिक ऊर्जा टिकून राहते. शिवाय त्यातं थायमिन व्हिटॅमिन असते जे स्मरणशक्ती सुधारते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *