A few tips for a neck that has turned black due to constant sun

सतत उन्हामुळे काळे पडलेल्या मानेसाठी काही टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या सौदर्यासाठी प्रत्येक जण विशेष काळजी करताना दिसते.पण अनेक वेळा दुर्लक्ष केल्याने, किंवा उन्हाने, खोटे दागिने घातल्याने मान काळी पडते. मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो, पण मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते, मानेमुळे तुमच्या सौदर्यात भर हि कमीच पडते. अश्या वेळी बाहेरून महागड्या वस्तूंचा वापर करण्याऐवजी काही घरगुती उपाय करणे फार आवश्यक आहे. असे कोणते घरगुती उपाय आहेत, ते पाहून घेऊया ….

उपाय —-

— एका बाऊलमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक ऍसिड  असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता. बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. मात्र मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या त्वचेवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये. अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो.

— नारळाच्या तेलाने त्वचेवरील घाण निघून जाते आणि तो भाग स्वच्छ होतो. या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाकून याला मिक्स करा. हलका लेयर लावून वाळल्यावर पाण्याच्या मदतीने राउंड स्क्रब करत पाण्याने पॅक काढा. यामध्ये मानेवरील मळ निघून जाण्यास मदत होते. आता पॅक लावण्यापूर्वी आधी पॅच टेस्ट करून पहा. हे पॅक हातावर लावून थोड्या वेळ वाट बघा. काही रिऍक्शन होत नसेल तरच हा पॅक मानेवर लावा.

— एक नरम टॉवेल गरम पाण्यातून काढून व्यवस्थित पिळून घ्या. या टॉवेलने मानेच्या जवळपासची जागा रगडून स्वच्छ करून घ्या टॉवेलमधून निघत असलेल्या वाफेने मळ खुलतील. थोड्या वेळाने याठिकाणी मॉईश्चरायजर लावा.

— खूप घरगुती उपाय केल्यावरही काळा डाग निघत नसेल, तर डॉक्टरांना भेटा, अनेक वेळा डायबेटीसची सुरूवात असताना मान काळी पडण्यास सुरूवात होते, तेव्हा रक्ताची चाचणी करून घेणे देखील फायदेशीर असते.

—मानेची स्वच्छता राखा.

मानेची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक असतं. तसेच दररोज आंघोळ करताना साबणाच्या मदतीने मान स्वच्छ करणंही आवश्यक आहे. यादरम्यान सर्क्युलर मोशनमध्ये मान स्वच्छ करा. पाण्याने धुतल्यानंतर मॉयश्चरायझर नक्की लावा.