A few tips when setting the bride's nose

वधूची नथ सेट करताना काही टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  वातावरण हे उन्हाळ्याच्या दिशेने जायला सुरुवात झाले आहे . त्यामुळे लग्नसराईच्या कार्यक्रमांना वेग पण आला आहे . यावर्षी कोविड मुळे अनेक कार्यक्रमांना बंदी आली आहे . तरीही काही प्रमाणात कार्यक्रम होताना दिसत आहेत. प्रत्येक वधू आपण सुंदर दिसावे यासाठी प्रयत्न करत असते. अगदी शेवट पर्यंत वधूची तयारी हि झालेली नसते . अशा वेळी वधूला नथ निवडताना कशा प्रकारे निवडावी यासाठी काही टिप्स वापरूयात …

आजकाल मुलींच्या नाकात जरी नथ घालायची असेल तर त्यावेळी नाकाला मात्र होल नसतो. त्यावेळी मुली या नेहमी प्रेस च्या नथीचा वापर करत असतात . पण ती घातलाना सुद्धा खूप काळजीपूर्वक घातली गेली पाहिजे . कारण जे त्याचे प्रेस व्यवस्थित झाले नाही तर मात्र ती सतत सैल पडून खाली येत असते . अशा वेळी वधूचा लुक हा खराब दिसू शकतो . म्हणून कशी काळजी घ्यावी याचा विचार करावा.

जास्त जड नथीचा वापर हा करू नये —

काही वधूच्या नाकाला होल नसल्याने जड नथ वापरू नये . आजकाल बाजारात अनेक नथींचे प्रकार आले आहेत . वेगवेगळ्या नथी असल्या तरी जड नथ तर अजिबात घालू नये. कारण ती नाकाला पण जड जाऊ शकते . बाजरातील नथींपैकी स्क्रू असलेली नथ हि निवडा म्हणजे ती एकदा घातली कि सतत हालत नाही . त्याची जागा हि स्थिर राहते . त्याचे स्क्रू हे तपासून पहा . जर स्क्रू हा वाकडा असेल तर मात्र आपल्या नाकाला त्रास हा जास्त होऊ शकतो.

नथ घालताना ची पद्धत हि व्यवस्थित समजून घ्या . कारण जर नथ हि वर वर घातली तर , मात्र त्याचा दांडा हा सतत खाली येत असतो. आणि त्यामुळे हात हा नाकाच्या जवळ जात असतो. नथ घेतली असेल तर कमीत कमी कोणत्याही कार्यक्रम च्या वेळी वापरण्याच्या अगोदर ती एकदा घालून पहा म्हणजे ती आपल्या चेहऱ्याला सूट होते कि नाही ते समजू शकते .