| |

काळ मीठ, हिंग आणि ओव्याचे मिश्रण म्हणजे अनेक आजारांवर रामबाण उपाय; जाणून घ्या वापर आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अचानक उदभवणारा कोणताही आरोग्यविषयक त्रास अनेकदा असह्य असतो. अशा त्रासांवर चुटकीत आराम मिळवायचा असेल तर घरगुती उपायांपेक्षा मोठे रामबाण उपाय सापडणार नाहीत. प्रत्येक लहान आजारापासून मोठ्या आजारांपर्यंत योग्य उपाय म्हणून काळे मीठ, हिंग आणि ओव्याच्या मिश्रणाचा वापर केला जातो. कारण ओवा, काळे मीठ आणि हिंग या तिन्ही पदार्थांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

जसे कि, ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे कोणत्याही अपचनाच्या त्रासात आराम देते. हिंग पोटफुगीच्या त्रासापासून आराम देते. शिवाय हिंगामध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-मायक्रोबियल आणि अँटीस्पास्मोडिक सारखे आवश्यक घटक असतात. तर काळ्या मीठाने पचनाशी संबंधित विकार दूर होतात. मात्र या मिश्रणाचे प्रमाण काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे. चला तर जाणुन घेऊयात या मिश्रणाचा वापर आणि फायदे खालीलप्रमाणे:-

० काळे मीठ, हिंग आणि ओव्याचे मिश्रण असे वापरा :-

१) गॅस वा अपचन – यासाठी ३ ग्रॅम काळे मीठ, चिमूटभर ओवा आणि चिमूटभर हिंग मिसळून सकाळ- संध्याकाळ पाण्यातून खा.

२) आम्लपित्त – तिन्ही जिन्नस सम प्रमाणात एकत्र करून थंड पाण्यासोबत सकाळी- संध्याकाळी रिकाम्या पोटी खा.

३) डोकेदुखी वा अंगदुखी – यासाठी तिन्ही जिन्नस सम प्रमाणात एकत्र करून सकाळ- संध्याकाळ साध्या पाण्यासोबत खा.

४) किडनीचा विकार – रस्ताही तिन्ही जिन्नसाचे मिश्रण समतोल प्रमाणात पाण्यासोबत सेवन करा.

५) पोटदुखी वा पोटफुगी – यासाठी नाभीमध्ये काळे मीठ, हिंग आणि ओवा तिन्ही पदार्थ चिमूटभर घेऊन १ चमचा मोहरीच्या तेलात मिसळून पोटाला लावा. यामुळे वेदना दूर होतील.

० काळे मीठ, हिंग आणि ओव्याचे मिश्रण खाण्याचे फायदे :-

१) पोटातील गॅस – काहीतरी अरबट चरबट खाल्ल्याने पोटात गॅस झाला तर हे मिश्रण खा. कारण यातील अँटीसेप्टिक आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म छातीतली जळजळ कमी करून आराम देतात.

२) कमकुवत पचन संस्था – खाल्लेले अन्न सहज पचत नसेल तर दररोज सकाळी एक चमचा ओवा, काळे मीठ आणि हिंग यांचे मिश्रण खा. यामुळे कमकुवत पचन संस्था मजबूत होणाया सहाय्य मिळते.

३) अपचनाचा त्रास – चयापचय बिघडल्यास अपचनाचा त्रास होतो. या त्रासावर रामबाण उपाय म्हणून हे मिश्रण खाणे फायदेशीर आहे. शिवाय यामुळे मासिक पाळीच्या वेदनांमध्येही आराम मिळतो. फक्त या मिश्रणाचे सेवन रिकाम्या पोटी करणे गरजेचे आहे.

४) सर्दी आणि फ्लू – या आजारावर हिंग, ओवा आणि काळे मीठ गुणकारी आहे. यासाठी हे मिश्रण कोमट पाण्यात मिसळून प्या आणि लगेच बरे व्हा.

५) लो बीपी – तुमचा बीपी कमी झाला तर या मिश्रणाचे सेवन करा. यामुळे लगेच आराम मिळतो. यासाठी ४ ग्रॅम मिश्रण कोमट पाण्यात मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्या. यामुळे लो बीपी नॉर्मल येईल.

० महत्वाचे – काळे मीठ, हिंग आणि ओवा नैसर्गिक घरगुती उपचार असल्याने याचा कोणताही अपाय नसला तरीही उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी या पदार्थांच्या प्रमाणाची पुरेपूर काळजी घ्यावी.
– या मिश्रणाचे सेवन फक्त सकाळी आणि संध्याकाळी करा.
– हे औषध तयार करण्यासाठी
१० ग्रॅम हिंग,
३०० ग्रॅम ओवा
२०० ग्रॅम काळे मीठ एकत्र करून औषध तयार करून ठेवा. पोटाशी संबंधित सर्व समस्यांवर हा एक रामबाण उपाय आहे.