|

या तेलांचे मिश्रण देई सौंदर्यवर्धक लाभ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी खूप सगळे केमिकल्स वापरलेली औषधे किंवा बाजारातील प्रॉडक्ट्स वापरण्याची काहीच गरज नाही. कारण बाजारात मिळणारे साैंदर्य उत्पादने जास्त प्रमाणात वापरल्याने आपली त्वचा अधिक खराब होण्याची शक्यता असते. यामुळे आपले साैंदर्य उत्पादने वापरण्यापेक्षा नेहमीच घरगुती उपाय हे केले पाहिजेत. जे आपली त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर होण्यास मदत करतात आणि आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होते. यासाठी नेरोली तेल, बदाम तेल आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून त्वचेला लावले असता आपली त्वचा चमकदार होते. आता तुम्ही म्हणाल कसं काय? तर हा लेख पूर्ण वाचा आणि जाणून घ्या.

० या उपायासाठी नेरोली तेल, बदाम तेल, ऑलिव्ह तेल प्रत्येकी १ चमचा घेऊन चांगले मिश्रण तयार करून घ्या. यानंतर हे तेल आपल्या संपूर्ण त्वचेला लावा. शक्यतो हे मिश्रण रात्री झोपण्याआधी लावा. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. याशिवाय आणखी नुसते बदामाचे तेल आणि खोबरेल तेल एकाकी देखील त्वचेस लाभ देण्यास सक्षम असतात.

० बदाम तेल – बदामात व्हिटामिन ई भरपूर असते. त्यामुळे हे तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर रंगही उजळण्यास मदत करते. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. हळूहळू, आपला रंग देखील उजळेल आणि त्वचा चमकू लागेल. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेल फायदेशीर आहे. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं.

० खोबरेल तेल – खोबरले तेल शरीरासाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा तजेलदार आणि मुलायम होते. शिवाय जर ओठ सतत सोलपटत असतील तर ओठांवर खाेबरेल तेल लावा. रात्री झोपण्याआधी सुरकुतलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावा. यामुळे ओठ मऊ होतील. शिवाय चेहऱ्यावर मुरूम येत असल्यास खोबरेल तेल लावल्याने आराम मिळतो. खोबरेल तेल चेहऱ्याला लावल्यामुळे पुरळदेखील कमी होण्यास मदत होते.

टीप – कोणतेही तेल आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार निवड कराल तरच लाभ होईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *