| | | |

चिमूटभर हिंग गंभीर आजारांवर गुणकारी; जाणून घ्या फायदे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजच्या काळात आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडेच वेळ नाही. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्या वाढतच जातात. मग विविध औषधे उपचार केल्यानंतरदेखील यांपासून सुटका मिळत नाही. पण जेव्हा घरातच औषध असेल तेव्हा बाहेरून आणण्याची काय गरज? अर्थात आपल्या रोजच्या वापरात असे अनेक पदार्थ असतात जे आरोग्यासाठी लाभदायी असतात. जसे कि – हिंग. साधारण हिंगाची चव आणि सुवास सर्वांसाठी ओळखीचा आहे. कारण आपल्या भारतीय जेवणामध्ये हिंगाचा सर्रास वापर केला जातो. मात्र तरीही चवीव्यतिरिक्त अगदी चिमूटभर हिंगाचे आरोग्यासाठी होणारे फायदे फार कमी लोक जाणतात. चला तर जाणून घेऊयात हिंगाचे औषधी गुणधर्म, फायदे आणि उपाय.

  • हिंगाचे औषधी गुणधर्म – अनेक लोक हिंग म्हणजे मसाला इतकेच जाणतात. मात्र हिंग अत्यंत गुणकारी औषध आहे. इतकेच काय तर, प्राचीन ऋषि मुनी महर्षी चरक यांनी सांगितले आहे की, हिंग हे दम्याच्या रोगावर रामबाण औषध आहे. आता हिंगाच्या औषधी गुणधर्मांबद्दल सांगायचे तर, त्यात अँटीबायोटिक आणि अँटीऑक्सिडेंट दोन्ही गुण आहेत. शिवाय आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, कैरोटीन, फायबर इत्यादी तत्वसुद्धा आहेत.
  • हिंगाचे फायदे
  1. दमा – हिंगामुळे कोरडा खोकला, दमा आणि अन्य आजारांवर फायदा होतो. शिवाय हिंग मधात किंवा गुळात मिसळून खाल्यास आणखी फायदा होतो.
  2. कफ वात नाशक – हींग कफ किंवा वात यांसारख्या समस्या मिटवते. शिवाय हिंगातील गुणधर्म लकवा सारख्या आजारांपासून सुटका देतात.
  3. मायग्रेन व डोकेदुखी – मायग्रेन, डोकेदुखीवर हिंग असरदार ठरते. हिंगातील औषधी गुणधर्मांमुळे मायग्रेन सारखे आजार दूर होऊन मेंदूला रक्त पुरवणाऱ्या नासा मोकळ्या होतात.
  4. पचनक्रिया सुधार – हिंगामुळे पचनक्रियेत सुधार होऊन अन्न पचण्यास मदत मिळते व भूक वाढते.
  5. डायबिटीज – हिंग खाल्ल्याने डायबिटीजच्या रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होते व साखर कमी व्हायला लागते.
  6. कंठ शुद्धी – हिंग खाल्याने शरीरातील गर्मी वाढते आणि कंठ साफ झाल्यामुळे आवाज सुद्धा साफ होतो.
  7. बहिरेपण – हिंगाचे तेल कानात टाकले असता कानात आवाज घुमत असेल तर तो थांबतो आणि बहिरेपण दूर होण्यास मदत होते.
  8. संसर्ग रोग – हवेमुळे होणाऱ्या कोणत्याही संसर्ग रोगांच्या विषाणूपासून हिंग बचाव करते. परिणामी संसर्ग रोग होण्याची शक्यता कमी होते.
  9. श्वसन रोग – हिंग हलके, गरम आणि पचायला चांगले असते. यामुळे श्वसनाचे आजार दूर होतात व खोकलयातही आराम मिळतो.
  10. असाध्य रोग – कॅन्सरसाठी हिंग अतिशय लाभदायक आहे. हिंगामुळे फक्त छोटे मोठे आजार नव्हे तर यामुळे खूप असाध्य रोगांवर उपचार करता येतात. हिंग नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे कॅन्सरसाठी प्रतिबंधक आहे. यामुळे कँसर पिडीतांसाठी हिंग औषध म्हणून काम करते.
  • मोठ्या रोगांसाठी करावयाचा उपाय –
    साधारण १ ग्लास कोमट पाण्यात गव्हाच्या दाण्याच्या आकाराची चिमूट भरून हिंग पाण्यात मिसळावे. यानंतर एका ठिकाणी बसून त्या पाण्याचे सेवन करावे.
    ऍसिडिटी, डायबिटीज, रक्ताची कमी आणि जोड्यामध्ये त्रास अश्या समस्यांसाठी दररोज हिंगाच्या पाण्याचे सेवन करा. हिंगातील अँटी इंफ्लेमेटरी गुण आपल्या पचनसंस्थेला ठीक करतात. शिवाय हिंगाचे पाणी हाडांना आणि दातांनासुद्धा मजबूत करतात.