|

ओटीपोटातील दुखणे यकृताच्या बिघाडाचे लक्षण; जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण अनेकदा डोकेदुखी, थकवा, पित्ताच्या उलट्या आणि पोटदुखी सौम्य आहे ,रोजच आहे, साधंच आहे अशी विविध कारणं देऊन दुर्लक्ष करत असतो. पण मित्रांनो, यातील कोणतीही समस्या उगाचच आणि सहज म्हणून होत नाही हे समजून घ्या. आरोग्याच्या प्रत्येक कुरबुरींमागे काहीना काही कारण हे असतंच. जसे कि पोटात दुखणे जितके साधे वाटते तितकेच ओटीपोटातील दुखणे साधे असेल असे नाही. कारण ओटीपोटातील वेदना या यकृताच्या बिघडलेल्या स्वास्थ्याची माहिती देत असतात. या आजाराला सायलेंट किलर म्हणता येईल. कारण या आजाराकडे वेळीच लक्ष दिले जात नाही परिणामी हळूहळू यकृताचे अतिशय नुकसान होते आणि गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.

– तज्ञ सांगतात कि, यकृतामध्ये बिघाड झाल्यास ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्कार टिश्यू बनवण्यास सुरुवात करते. परंतु, काहीवेळा या टिश्यूज अधिक कडक होतात आणि निरोगी ऊतकांमध्ये बदलतात. यामुळे यकृताला नुकसान होते आणि गंभीर समस्या निर्माण होतात. याला मराठीत यकृत वाढणे वा यकृत निकामी होणे असे म्हणतात.

० यकृत निकामी होण्याची कारणे

– ही समस्या अनेकदा लिव्हर सिरोसिस किंवा फॅटी लिव्हरमुळे उद्भवते.

– अशा अनेक प्रकरणांमध्ये, पित्ताशयातील अडथळ्यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते हे सिद्ध झाले आहे.

– मद्यपान अर्थात दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.

– लठ्ठ आणि हिपॅटायटीसचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्येदेखील यकृत निकामी होण्याची शक्यता असते.

लक्षणे – याविषयी सांगताना डॉक्टर म्हणाले कि, यकृत निकामी होण्याची लक्षणे हळूहळू दिसून येतात. म्हणूनच याला सायलेंट किलर म्हणतात. अनेक प्रकरणांमध्ये, यकृत पूर्णपणे निकामी झाल्यानंतर खालील लक्षणे आढळतात.
– ओटीपोटात दुखणे
– शारीरिक थकवा
– मळमळ
– उलट्या
– तोंडाची चव जाणे
– अन्नावरची वासना उडणे

कसा करालं बचाव?
– डॉक्टर सांगतात कि, यकृताच्या कोणत्याही समस्येपासून सुटका हवी असेल तर सगळ्यात आधी आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे.
जसे कि आपल्या रोजच्या जेवणात साखर, मीठ आणि मैद्याचा वापर कमीत कमी करावा.
जे लोक दारू पितात त्यांनी हे व्यसन सोडून द्यावे.
दैनंदिन आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात घ्यावीत.
दररोज व्यायाम करावा.
वजन जास्त असल्यास कमी करण्याचा प्रयत्न करावा.