adar poonavala
| |

आदर पुनावाला यांनी स्वत:ला टोचून घेतली कोव्हिशिल्ड लस; पहा Video

पुणे | सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी आज कोव्हिशिल्ड लस स्वत:ला टोचून घेतली आहे. याबाबत स्वत: पुनावाला यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेयर करुन माहिती दिलीय. देशभर आज कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरवात झालीय. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज सकाळी 10:30 वाजता लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पार पडले. यानंतर देशभर लसीकरणाला सुरवात झाली.

प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात येत असून लसीकरणामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. कोरोना लसीकरणाचे काही साईड इफेक्ट्स आहेत काय अशी शंका सर्वसामान्य नागरिकांना आहे. त्यामुळे आता पुनावाला यांनी स्वत: लस घेऊन या लसीचे काहीही साईड इफेक्ट नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केलाय.