कोरोनानंतर आता स्क्रब टायफसचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

0
330
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गतवर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना विविध आजारांनी आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. जसे की डेंग्यू, मलेरिया आणि आता या पाठोपाठ स्क्रब टायफस. होय. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उत्तरप्रदेशात स्क्रब टायफस या रहस्यमयी रोगाची एक वेगळीच दहशत निर्माण झाली आहे. एकीकडे संपूर्ण जगावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट येऊ घातले आहे. यात आता स्क्रब टायफसचा वाढता धोका पाहून आरोग्य यंत्रणा आणि जनसामन्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्क्रब टायफसची माहिती देणार आहोत. जसे की स्क्रब टायफस काय आहे? त्याची लक्षणे कोणती आणि उपाय काय आहेत. हे सर्व काही जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

१) ‘स्क्रब टायफस’ काय आहे?
– स्क्रब टायफस हा एक रोग असून ‘सुटसुगमुशी’ नावाच्या जीवाणुमुळे होतो. या स्क्रब टायफसचा प्रसार संक्रमित कीटक चावल्याने होतो. शिवाय या रोगाची लक्षणे सर्वसाधारणपणे चिकनगुनियाच्या आजारासारखी असतात. मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक आहे. त्यामूळे स्क्रब टायफस झालेल्या रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.

२) ‘स्क्रब टायफस’ची लक्षणे काय?
– स्क्रब टायफसची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे :-
ताप
डोकेदुखी
अंगदुखी
थकवा
अंगावर काळे चट्टे
अंगावर अनेक ठिकाणी सूज
जिभेची चव जाणे
ही सर्व लक्षणे आहेत.

३) ‘स्क्रब टायफस’वर उपाय :-
– ‘स्क्रब टायफस’वर अद्याप कोणतीही लस नाही. त्यामुळे यावर उपाय असे काही सांगता येणार नाही. मात्र खबरदारी घेता येईल. जसे की संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे. अर्थात सोशल डिस्टन्सिंगचे पालन कारणे.


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here