Almond for hairs
| |

कोरड्या आणि निर्जीव केसांसाठी आलमन्ड हेअरमास्क अत्यंत प्रभावी; जाणून घ्या कसे बनवालं..?

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले केस सुंदर आणि निरोगी असावे हि इच्छा आता अगदी घरच्या घरी पूर्ण होऊ शकते. तुम्ही तर हे जाणत असालच कि अगदी एक बदामही आरोग्यासाठी लाभदायक आहे. ते कसं..?

तर बदामामध्ये फायबर 3.5 ग्रॅम, प्रोटीन 6 ग्रॅम, फॅट 14 ग्रॅम ( मोनोसॅच्युरेटेडचे प्रमाण जास्त), मॅगनीझ 20%, व्हिटॅमिन ई 37%, मॅग्नेशिअम 20% याशिवाय कॉपर, व्हिटॅमिन बी2 आणि फॉस्फरस हे सर्व घटक असतात. ज्यामुळे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आणि त्वचेचे आरोग्य देखील सुरळीत राहते. यात जर केसांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा विषय असेल तर बदामाचे हेअर मास्क अत्यंत प्रभावी आणि घरगुती उपाय आहेत. फक्त ते कसे बनवायचे हे जर माहित नसेल तर काळजी करू नका हा लेख पूर्ण वाचा.

० अंड आणि बदामाचे तेल

यासाठी एका अंड्याचा पांढरा बलक घेऊन फेटायचा आणि त्यामध्ये बदामाचे तेल घालून केसांना तयार मास्क लावा. हा मास्क तेलाप्रमाणे आहे. त्यामुळे हा मास्क लावून मसाज करा आणि मग केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यातील अंड्यामुळे केस मऊ होतात. तर बदामातून मिळणारे पोषण केसांची वाढ सुरळीत करतात.

० मध, केळ आणि बदाम

यासाठी एका भांड्यात मूठभर वाटलेले बदाम, मोठा चमचा मध आणि पिकलेलं केळं एकत्र करुन तयार हेअर मास्क केसांना लावा. हा मास्क लावल्यानंतर गरम पाण्याची वाफ घ्या. साधारण ३० मिनिटांनी केस धुवून टाका. यामुळे केसांमधील कोरडेपणा निघून जातो. केस मुलायम आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसतात.

० अवकाडो आणि बदाम

यासाठी अवाकाडो आाणि बदाम समप्रमाणात घेऊन त्याची पेस्ट करा. आता तयार मास्क केसांवर आणि स्काल्पला बोटाच्या सहाय्याने लावा. साधारण पाऊण तासांनी केस कोमट पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने धुवा. यामुळे केसगळती थांबेल आणि केस चांगले वाढतील.