| | |

तुरटी माहित आहे पण फायदे माहित नाहीत? मग लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्यापैकी अनेक जण असे असतील ज्यांना तुरटी तर माहित आहे पण नेमके त्याचे फायदे माहित नाहीत. अनेकांना तुरटीचा वापर पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी होतो हे माहित आहे. परंतु याशिवाय देखील तुरटीची अनेक बहुगुणकारी असे फायदे आहेत. तुरटीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. इतकेच नव्हे तर तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट आणि ऍस्ट्रिंन्जन्ट व हेमोस्टेटीक गुणधर्म देखील समाविष्ट असतात. यामुळे आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक फायदे होतात. चला तर मग जाऊन घेऊयात तुरटीचे फायदे. खालीलप्रमाणे:-

१) डिटॉक्सिफिकेशन- तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. या मॅग्नेशियममुळे शरीरास हानिकारक असणारे पदार्थ निघून जातात. यामुळे शारीरिक थकवा, ताण आणि तणाव दूर करण्यासाठी आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ करावी. याने बॉडी डिटॉक्स (आंतरिक स्वच्छता) होण्यास मदत होते.

२) शारीरिक दुर्गंधता व अंगदुखी – तुरटीमध्ये असणारे मॅग्नेशियम शारीरिक अंगदुखीवर परिणामकारक असतात. यामुळे शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्यावर तुरटीच्या पाण्याचा शेक दिल्याने दुखणे बरे होते. या शिवाय शरीराला दुर्गध येण्याची समस्या असेल ती देखील तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यास दूर होते.

३) शारीरिक जखमांवर गुणकारी – शरीरावर एखादा घाव अथवा एखादी जखम झाली असेल तर त्यावर तुरटीचा उपयोग केल्यास जखम बरी होण्यास मदत होते. कारण तुरटीमध्ये ऍस्ट्रिंन्जन्ट आणि हेमोस्टेटीक गुणधर्म असतात ज्यामुळे जखम लवकर बरी होते. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा तुरटी पावडर मिसळून पाणी कोमट झाल्यावर त्या पाण्याने जखम धुवा.‍ असे दिवसातून दोन ते तीन वेळा केल्याने जखमेद्वारे शरीरात जाणाऱ्या जंतूंचाही नॅश होतो आणि जखम लवकर बरी होते.

४) दातांची समस्या – जर आपल्याला दातांची समस्या असेल तर यावर तुरती अतिशय गुणकारी आहे. यासाठी तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरा. यामूळे तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो आणि हिरड्यांच्या नसा मजबूत होतात. शिवाय तोंडाला दुर्गंध येण्याची समस्या देखील नाहीशी होते.

५) त्वचा मऊ करण्यासाठी – आपण पाहिले असाल कि पुरुषांच्या अनेक सॅलोनमध्ये शेव्हिंगनंतर लोशन वापरण्याऐवजी तुरटी वापरली जाते. कारण तुरटीमध्ये त्वचा मऊ करणारे गुणधर्म असतात. शिवाय तुरटी नैसर्गिक स्क्रबर असल्यामुळे त्वचेला हानी होत नाही. यासाठी, शेव्हिंगनंतर तुरटीचा खडा फिरवावा व दोन मिनिटाने थंड पाण्याने चेहरा धुवुन घ्यावा.

६) पायांच्या भेगांपासून आराम – अनेकांना पायाच्या तळव्यांना भेगा पडणे आणि जखमा होण्याची समस्या त्रास देत असते. यामुळे जर तुम्हाला देखील पाय फाटण्याची समस्या भेडसावत असेल तर नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासावा. याने ही समस्या लवकरच बरी होईल.

७) केसांचे आरोग्य – केसांमध्ये कोंडा, उवा, लीक झाल्यास केसांचे आरोग्य चिंतेत येते आणि केस निस्तेज होतात शिवाय पातळ होऊन भरपूर प्रमाणात गळतात. यामुळे टक्कल देखील पडते. या समस्यांवर तुरटी लाभदायक आहे. यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिसळून मिश्रण तयार करा. ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. हे असे आठवड्यातून २ वेळा केल्यास केसांच्या समस्येपासून अराम मिळेल.