| |

झुंबा वर्कआऊट कराल तर नेहमी उत्साही रहाल; जाणून घ्या इतर फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. अनेकदा बाहेरचे खाणे पिणे हे शरीराशी संबंधित समस्यांना उभारी देतात. यात प्रामुख्याने वाढते वजन हि एक मोठी आणि गंभीर समस्या होऊ लागली आहे. मात्र दगदगीच्या आयुष्यत आरोग्याकडे लक्ष देणे अतिशय कठीण झाले आहे. व्यस्त कारभारामुळे आधीच अंगात त्राण उरत नाहीत त्यात वजन आटोक्यात आणण्यासाठी वर्कआउट करावा लागतो त्यासाठी उत्साह आणायचा कुठून? असा मोठा प्रश्न निर्माण होतो. पण चिंता कशाला करताय? झुंबा एक असा वर्कआऊट आहे ज्यामुळे कितीही कंटाळा आला असेल तरीही कोणताही माणूस अगदी जोशाने हे सेशन पार पाडतो.

 • झुंबा म्हणजे काय?
  – झुंबा म्हणजे एकामागोमाग एक गाणी लावून त्यावर ठरावीक पद्धतीने बसवलेल्या डान्सप्रमाणे स्टेप्स करणे. यात संगीत व गाणी ठरलेली असतात आणि हे संगीतच झुंबाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या व्यायाम प्रकारात शेवटी ‘कूल डाऊन’ व्यायाम तसेच स्नायूंचे व शरीराला चांगल्या प्रकारे ताण देण्याचे (स्ट्रेचिंग) व्यायाम केले जातात. हा १ तासाचा ‘वर्कआऊट’ असतो. या व्यायाम प्रकाराला जिमच्या भाषेत ‘कार्डिओ – रेस्पिरेटरी वर्कआऊट’ असे संबोधले जाते. महत्वाची बाब अशी कि, यातला कोणताही डान्स शिकणे व करणे अवघड नसते.

चला तर जाणून घेऊयात इतर फायदे :-

 • शारीरिक हालचाली करताना शरीराला योग्य पद्धतीने रक्तपुरवठा हाेतो. यामुळे हृदयाचे काम वाढते आणि प्राणवायू अधिक घ्यावा लागतो. त्यामुळे श्वासोच्छवासही वाढतो आणि ३ ते ४ महिने सातत्याने हा व्यायाम केल्यानंतर शरीराचा ‘स्टॅमिना’ वाढल्याचे जाणवते.
 • नाचताना हाता पायाच्या हालचाली खूप असतात. या एकाच प्रकारच्या हालचालींमुळे स्नायूंचा उत्तम व्यायाम होतो आणि स्नायू पिळदार होतात.
 • नाचताना खूप घाम येतो आणि शरीरातील नको असलेली घटक द्रव्ये उत्सर्जित अर्थात बाहेर टाकण्यास मदत होते.
 • झुंबामुळे शरीरात स्त्रवणाऱ्या संप्रेरकांची यंत्रणा सुधारते. तसेच चयापचय क्रियेतही सुधार होतो. परिणामी चांगली भूक लागते.
 • इतर कोणताही विचार न करता तासभर पूर्ण लक्ष देऊन व्यायाम केल्याने शरीर हलके वाटते आणि ताजेतवाने वाटू लागते.
 • एरोबिक्स व नाचाच्या व्यायामात सांध्यांचा चांगला व्यायाम होतो. भविष्यात संधिवात, हाडे ठिसूळ होणे या गोष्टी टाळता येतात.
 • वजन कमी करण्यासाठी आणि कमी झालेले वजन राखण्यासाठी हा व्यायाम व जोडीने ‘वेट ट्रेनिंग’सारखे इतर व्यायाम करणे फायद्याचे ठरते.
 • उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य सल्ला घेऊन हा व्यायाम करता येतो. या आजारांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम अश्या व्यायामाने काही प्रमाणात कमी करता येतो.
 • एकटे चालणे वा पळणे, जिममध्ये जाऊन व्यायाम करणे या गोष्टी काही दिवसांनी कंटाळवाण्या वाटतात. मात्र संगीताच्या तालावर नाचण्याचा कंटाळा येत नाही आणि सोबत बरोबरीच्या गटातील सगळेच नाचत असतात. त्यामुळे नव्याने आलेल्या व्यक्तीचा उत्साह टिकतो.