| | |

अमरवेल मुळापासून रोगांना करते दूर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आयुर्वेदातील एक औषधी जिला अमरवेल म्हणून ओळखले जाते हि आपल्या शरीराला जडलेले कित्येक रोग मुळातून दूर करण्यास सक्षम असते. हि अमरवेल हिरव्या पिवळ्या रंगाची दिसते आणि याला पाने नसतात. हि वेळ झाडाला गुंडाळलेली असते. अमरवेलीचा काढा शरीराला आजारांपासून दोन करण्यासाठी ताकद प्रदान करतो. हा काढा खालीलप्रमाणे बनवला जातो.

– एक ग्लास पाण्यात थोडीशी अमरवेल शिजवा आणि हे पाणी एक तृतीयांश शिल्लक होईपर्यंत चांगले उकळून घ्या. यानंतर ते गाळून घ्या आणि याचे सेवन करा. हा काढा सकाळी रिकाम्या पोटी प्या किंवा दिवसातून कधीही एकदा प्या. याशिवाय अमरवेलचे सेवन करून ते कोरडे देखील ग्रहण करता येईल. याव्यतिरिक्त अमरवेलीची पावडर बनवून त्याचा चूर्णासारखा प्रयोग करावा. यासाठी गरम पाण्यात एक चमचा अमरवेलीची पावडर घ्या आणि त्याचे सेवन करा. चला तर जाऊन घेऊयात अमरवेलीचे सेवन करण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोग प्रतिकारक शक्तीत सुधार – अमरवेलमध्ये अँटीऑक्सिडेंट घटक आढळतात, म्हणूनच ते आपल्याला रोगांपासून वाचवते. त्यामुळे अमरवेलीचे सेवन रोगांविरूद्ध लढण्यासाठी आवश्यक असणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे कोणतेही संसर्गजन्य रोग आपल्या शरीरापासून दूर राहतात.

२) मधुमेहापासून सुटका – मधुमेहावर अमरवेल अत्यंत फायदेशीर आहे. अमरवेलीचे सेवन केल्यास शरीरातील ग्लूकोजची पातळी कमी होते आणि मधुमेहापासून सुटका मिळण्यास मदत होते.

३) यकृताचे संरक्षण – यकृत डिटोक्स करण्यासाठी अमरवेलीचा काढा प्या. यामुळे यकृतातील सर्व घाण बाहेर पडेल आणि यकृताच्या आजारांपासून सुरक्षित राहाल.

४) मजबूत हाडे – अमरवेलीत कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर असते. जे हाडे मजबूत करतात. त्यामुळे अमृतवेलीचे सेवन शरीरात कॅल्शियमची कमतरता पूर्ण करते आणि हाडांना बळकटी देते. यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठीचा त्रास दूर होतो.

५) दृष्टी सुधार – अमरवेलीचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. शिवाय चष्मा निघून जातो. अमरवेलीचे चूर्ण वा काढा दोन्हीही यासाठी प्रभावी ठरतात.

६) केसांची काळजी – अमरवेलीचे सेवन केल्यास रक्त परिसंचरण योग्य राहते. ज्यामुळे केस वाढतात आणि केस मजबूतदेखील बनतात. यासाठी १ लिटर पाण्यात ५० ग्रॅम अमरवेल शिजवा आणि त्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसगळती बंद होईल आणि अकाली केस पांढरे होणार नाहीत. शिवाय केसांची वाढ झपाट्याने होते.

७) कर्करोगावर रोख – एका संशोधनानुसार, अमरवेल कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. कारण अमरवेलीचे दररोज सेवन केल्यास शरीरात कर्करोगाच्या पेशी फुलत नाहीत आणि कर्करोगाच्या जोखमीपासून संरक्षण होते.