Amla Seeds
| | | |

आवळ्याच्या बिया देतात जादुई फायदे; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याच्या दिवसात आवळा खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. कारण आवळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते सौंदर्याची काळजी घेण्यापर्यंत सर्व समस्यांचे समाधान आहे. इतकेच नव्हे तर आवळ्याच्या गराइतक्याच आवळ्याच्या बियादेखील फायदेशीर आहेत. कारण आवळ्याच्या बियांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स, कॅरोटीन, लोह आणि फायबरसारखे अनेक पोषक घटक असतात. जे आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यास सक्षम आहेत. शिवाय आवळ्याच्या बिया काही दिवस उन्हात वाळवून त्याची पावडर बनवून ठेवली आणि पाण्यासोबत दररोज उपाशी पोटी त्याचे सेवन केले तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांमध्ये फायदा होतो. Indian Gooseberry म्हणून ओळखला जाणारा आवळा हा आयुर्वेदातही अत्यंत मोलाचे स्थान प्राप्त असलेला उत्तम पर्याय आहे. आवळा चवीला तुरट असला तरीही आरोग्यासाठी याहून उत्तम पर्याय कोणताच नाही. चला तर आवळ्याच्या बियांचे फायदे खालील फोटोंच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पहा फोटो खालीलप्रमाणे:-

आवळ्याच्या बियांचे फायदे:-