Headache
| |

सततच्या डोकेदुखीने केलं हैराण..?; जाणून घ्या योगमुद्रा ज्या देतील आराम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल कामाचा ताण आणि घरगुती वाद वा इतर अनेक गोष्टींमुळे डोकेदुखीची समस्या होते. हि समस्या अतिशय सामान्य झाली असली तरीही त्रासदायी आहे. मान आणि डोक्यावरच्या भागात होणाऱ्या वेदनांना आपण ‘डोकेदुखी’ म्हणतो. हि डोकेदुखी मन आणि डोकं दोन्ही अशांत करते. यामुळे शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता येते. अनेकदा हि डोकेदुखी सौम्य तर अनेकदा गंभीर असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये. अनेक लोक डोकळेदुखीवर विविध औषधे गोळ्या घेतात. पण हि औषधेदेखील अनेकदा हानिकारक ठरू शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही योग्य मुद्रा सांगणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने तुमची डोकेदुखी कुठच्या कुठे पळून जाईल.

१. प्राण मुद्रा – प्राण मुद्रा डोकेदुखीच्या समस्येपासून आराम देण्यास सहाय्यक आहे. या मुद्रेत पृथ्वी, पाणी आणि शरीरातील अग्नी घटकांचा समावेश आहे. हि मुद्रा पित्तामुळे होणारी डोकेदुखी कमी करते.

२. सहस्रार मुद्रा – सहस्रार हा शब्द सातवे चक्र सक्रिय करतो. हे चक्र डोक्यावरच्या बाजूला असते. सहस्रार मुद्रा अतिविचार आणि तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम देते.

३. महाशिर्ष मुद्रा – डोकेदुखी, मायग्रेन, सायनस, तणाव यासारख्या त्रासांमधून मुक्त होण्यासाठी महाशिर्ष मुद्रा उपयुक्त आहे. हि मुद्रा पृथ्वीशी संबंधित असून तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता देते.

४. त्रिमुखा मुद्रा – त्रिमुखी मुद्रा ही दोन्ही हात जोडून केली जाते. यामध्ये करंगळी, अनामिका आणि मधली बोट मिसळलेली असते. हि मुद्रा पाणी, पृथ्वी आणि अवकाशातील घटकांशी समबंधित आहे. या मुद्रेमुळे कोणतीही डोकेदुखीची समस्या दूर होते.

वरील सर्व मुद्रा सौम्य असो वा तीव्र अश्या कोणत्याही डोकेदुखीवर परिणामकारक आहेत. या मुद्रांचा अभ्यास ३० ते ४० मिनिटे नियमित करा. यामुळे डोकेदुखीपासून मुक्तता मिळेल.