सांधेदुखीने झालात हैराण..? तर ओव्याची पाने देतील आराम; जाणून घ्या

0
209
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। उतरत्या वयोमानानुसार मानवी शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांमध्ये अनेकदा माणूस खचत जातो. विविध आजार त्याचे सोबत होऊ लागतात. यात सर्वसामान्य आजार म्हणून सांधेदुखी ओळखला जातो. गुडघ्यांचे दुखणे, पाठीत कळा जाणे उठताना बसताना त्रास होणे. शिवाय पडल्यास हाड मोडणे, हाडांचा ठिसूळपणा अशा समस्या सांधेदुखीमुळे होत असतात. हा त्रास सहसा पाठ न सोडणारा असतो त्यामुळे वृद्धापकाळात लोक या आजाराची सवय करून घेतात.

पण जर तुम्ही तरुण असतानाच अशा आजरांसाठी प्रतिबंध वापरलात तर पुढील काळात त्याचा फायदा होऊ शकतो. जसे कि ओव्याची पाने संधिवातावर प्रभावी उपाय आहेत. तर ओव्याच्या पानांचा योग्य वापर केल्यास तुम्ही नक्कीच संधिवातावर मात करू शकता. पण त्याचा वापर कसा करायचा हे माहित नसेल तर वेळ न घालवता त्वरित जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० ओव्याची पाने सांधेदुखीत कसा आराम देतात.. ?

गेल्या अनेक वर्षांपासून ओव्याच्या पानांचा वापर हा पोटाशी निगडित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जात आहे. पण ओव्यांतील प्रतिबंधात्मक संयुगे हि इतरही अनेक आजारांवर प्रभावी आहेत. जसे कि संधिवात. तर संधिवातावर ओव्याची पाने कशी प्रभावीपणे काम करतात हे जाणून घेऊया.

१) ओव्याच्या पानांमध्ये दाहक- विरोधी संयुगे असतात. ज्यामुळे संधिवातात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी ओव्याच्या पानांचा वापर होतो. यासाठी ओव्याची पाने ठेचून त्याची पेस्ट सांध्यांवर लावा आणि वेदनांपासून आराम मिळवा.

२) ओव्याच्या पानांमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म मोठ्या मात्रेत असतात. त्यामुळे संधिवाताची समस्या असलेल्या व्यक्तींच्या वेदना आणि जळजळ दोन्ही कमी करण्यासाठी ओव्याच्या पानांचा लेप मदत करतो.

३) ओव्याच्या पानांमध्ये प्रतिजैविक संयुगे असतात. हि संयुगे जळजळ आणि इतर संबंधित लक्षणे जसे की त्वचेचा लालसरपणा कमी करण्यास मदत करतात.

४) जुना संधिवात असल्यास पाण्यात ओव्याची पाने गरम करून या गरम पाण्यात दुखणारे सांधे ५ ते १० मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे सूज आणि वेदना कमी होतात.


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here