| |

डँड्रफच्या समस्येने केले हैराण..? जाणून घ्या कारणे आणि उपाय रामबाण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। डँड्रफच्या समस्येने आजकाल अनेकजण त्रस्त आहेत. मुख्य म्हणजे पावसाळा आला कि या समस्यांना आणखीच उधाण येतो. मग अनेक शाम्पू, क्रीम आणि अगदी आयुर्वेदिक तेलसुद्धा कामी येत नाहीत. कधी कधी अनेक प्रयत्नांनी किंवा एखाद्या शाम्पूने डँड्रफपासून तात्पुरती मुक्ती मिळते. मात्र हे सुख फार थोड्या दिवसांत विरून जाते आन पुन्हा एकदा डँड्रफची समस्या बळावते. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला डँड्रफ का होतो? त्याची कारणे काय? हे सांगणार आहोत आणि इतकेच नव्हे तर असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला बघता बघता डँड्रफपासूनची कायमची सुटका मिळवून देतील.

* डँड्रफ होण्याचे मुख्य कारण काय?
मुख्य म्हणजे शरीरातील पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे किंवा रक्तप्रवाह कमी झाल्याने आपल्या डोक्याची त्वचा राकट आणि कोरडी होऊ लागते. यामुळे केसांत कोंडा अर्थात डँड्रफ होण्यास सुरवात होते. याची अनेक कारणे असतात. यातील मुख्य कारणे म्हणजे केस व्यवस्थित न धुणे, दररोज केस न विंचरणे, ताण – तणावाच्या समस्या किंवा त्वचेच्या विविध एलर्जी या अश्या अनेक गोष्टी केसांतील कोंड्यास कारणीभूत असतात. परिणामी कोंड्यामुळे केसगळतीची तक्रार अनेकांना जाणवते आणि लवकर टक्कल पडते. मात्र काही घरगुती उपचारांचा नियमित वापर केल्याने डँड्रफपासून सुटका मिळवता येईल. तर जाणून घेऊयात हे उपाय.

* घरगुती उपाय :-

१) खोबरेल तेल – खोबरेल तेल/ नारळ तेल डोक्याच्या टाळूला मॉइश्चराइझ करते. इतकेच नव्हे तर आवश्यक ते पोषणही पुरवते. त्यामुळे या तेलाचा वापर अत्यंत फायदेशीर आहे. हा उपाय वापरण्यासाठी, टाळूवर हलक्या हातांनी तीन ते चार चमचे खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा. हे तेल लावल्यानंतर अर्धा तास असेच ठेवा आणि यानंतर सौम्य शाम्पूने हलक्या कोमट पाण्याचा वापर करून डोके धुवा.

२) कोरफडीच्या गराचा वापर – डँड्रफच्या समस्येने जे लोक त्रासलेले असतात त्यांच्या डोक्याला अर्थात स्काल्पला खाज सुटु लागते आणि हि खाज इतकी प्रभावी असते कि कितीही रोखण्याचा प्रयत्न केला असता आपल्या हातांवर नियंत्रण राहत नाही. मात्र या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडीचा गर अत्यंत गुणकारी आहे. हा उपाय वापरण्यासाठी, केस धुण्याआधी केसाच्या त्वचेवर कोरफडीचा गर किंवा जेल लावून हळूवारपणे मसाज करा आणि तासाभरानंतर केस सौम्य शाम्पूचा वापर करून धुवून टाका.

३) एप्पल सायडर व्हिनेगर – एप्पल सायडर व्हिनेगरमध्ये प्रामुख्याने अँटी-फंगल घटक असतात. जे पाण्याच्या साठ्यामुळे किंवा घामामुळे स्कॅल्पवर चढणाऱ्या बुरशीतुन तयार होणारा डँड्रफ काढून टाकण्यास प्रभावशाली असते. हे घटक स्काल्पच्या पीएच पातळीस संतुलित करण्यास मदत करतात. हा उपाय वापरण्यासाठी एप्पल सायडर व्हिनेगर पाव कप पाण्यात मिसळा आणि नंतर टाळूवर हळुवारपणे लावा. कमीतकमी १५ ते २० मिनिटांनी सौम्य शाम्पूने आपले केस धुवा आणि कोरडे करा.