| | | |

अँपल व्हिनेगर शरीरासाठी प्रत्येकप्रकारे फायदेशीर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीराचे कोणत्याही रोगापासून संरक्षण होते, हे आम्ही नाही तर डॉक्टर स्वतः सांगतात. याचे कारण असे कि, सफरचंदांमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात. जे रोग बरे होण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहित आहे का? सफरचंद शरीरासाठी जितके फायदेशीर तितकेच सफरचंदाचे व्हिनेगर देखील शरीराच्या सर्व रोगांवर परिणामकारक आहे. अगदी शरीराच्या आजारांसह त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीदेखील हे फायदेशीर मानले जाते. अगदी एखादे टॉनिक म्हणूनदेखील याचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊयात अँपल व्हिनेगरचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोग प्रतिकारशक्तीत वाढ – रोगप्रतिकारशक्ती मजबूत कारण्यासाठी अँपल व्हिनेगर फायदेशीर ठरू शकते. कारण, त्यात व्हिटॅमिन सी असते. जे रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.

२) शरीर डिटॉक्सिफाई करणे – अँपल व्हिनेगर शरीरातील विषारी द्रव्ये काढून शरीर डिटॉक्स करते. मुळातच अँपल व्हिनेगरमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे आपल्या शरीरास डिटॉक्स करण्यास मदत करतात आणि रोगांपासून शरीराचा बचाव करतात.

३) उच्च रक्तदाब – अँपल व्हिनेगर रक्तदाब कमी करून उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवते.यातील पोटॅशियम वारंवार रक्तदाब वाढण्यापासून प्रतिबंधित करते. यासाठी उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी दररोज २ चमचे अँपल व्हिनेगर घ्यावे.

४) मधुमेहींसाठी फायदेशीर – एका संशोधनानुसार, अँपल व्हिनेगर रक्तातील साखर नियंत्रित करते. यातील एसिटिक घटक रक्तवाहिन्यांमधील साखरेची पातळी कमी करते.

५) सांधे दुखी – यातील एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सांध्यांच्या वेदनापासून मुक्त होण्यासाठी मदत करतात. यामुळे दररोज कमीतकमी ५ लिटर गरम पाण्यात १कप अँपल व्हिनेगर घाला आणि या पाण्याने सांधे शेकवा किंवा अंघोळ करा. यामुळे सांध्यातील वेदना फर होऊन स्नायू मजबूत होतील.

६) सर्दीवर परिणामकारक – सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी अँपल व्हिनेगर उपयुक्त मानले जाते. यातील अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म सर्दीमध्ये तसेच सायनसमध्ये फायदेशीर असतात.

७) घश्यातील खवखव – अँपल व्हिनेगरमधील बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म संसर्ग दूर करण्यास आणि घसा खवखवण्यापासून आराम देण्यास मदत करतात. यासाठी २ चमचे अँपल व्हिनेगर १ कप कोमट पाण्यात मिसळून थोड्या थोड्या वेळात प्यावे.

८) तोंडाचे विकार – तोंडाशी संबंधित कोणत्याही समस्या वा विकारांपासून मुक्त होण्यासाठी सफरचंद व्हिनेगर प्रभावी आहे. शिवाय तोंडातून दुर्गंध येत असेल तर त्यावरही हे परिणामकारक आहे. तोंडाच्या अल्सरपासून सुटका मिळवण्यासाठीदेखील अँपल व्हिनेगर मदत करते.

९) वेट लॉस – अँपल व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यातील पोषक चरबी बर्न करतात आणि यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात राहतो. अँपल व्हिनेगर पचनशक्ती सुलभ करून चयापचय मजबूत करते. परिणामी वजन नियंत्रित राहते.

१०) कोलेस्टेरॉल कंट्रोल – अँपल व्हिनेगर कोलेस्टेरॉल कमी ककरते. यातील पेक्टिन शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करते आणि हृदयाच्या आजारांपासून शरीराचे रक्षण करते. हे रक्त पेशींमध्ये रक्त जमणे प्रतिबंधित करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

११) सुंदर केस – केसांची चमक वाढविण्यासाठी आणि मऊ बनविण्यासाठी अँपल व्हिनेगर कार्य करते. केसांच्या आरोग्यासाठी केस धुण्यानंतर समान प्रमाणात पाणी आणि अँपल व्हिनेगर मिसळा. यानंतर हे केसांना लावा आणि थोड्या वेळात केस धुवा. हे केस निरोगी आणि कोमल बनवेल.

१२) चमकदार त्वचा – चेहऱ्यावर मुरुम असल्यास आणि जास्त तेलयुक्त त्वचा असल्यास कापसाच्या मदतीने समान प्रमाणात पाणी आणि अँपल व्हिनेगर मिसळा व तोंडावर हलके लावा. पुढे १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.