| | |

अर्जुनाची शक्तिशाली आयुर्वेदिक पावडर हृदयाचे करते संरक्षण; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अर्जुन एक अशी वनस्पती आहे जिचा आयुर्वेदात अत्यंत प्रभावी औषधी म्हणून उल्लेख केलेला आहे. अर्जुनाचे झाड शतकानुशतके आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जात आहे. यात अर्जुनाची साल आणि त्याच्या पानांचा रस सामान्यतः औषध म्हणून वापरला जातो. याच्या सालीचे अनेको फायदे आहेत. हृदयरोग, क्षयरोग किंवा कान दुखणे, सूज, ताप यावर उपचार करण्यासाठी तिचा वापर होतो. अर्जुनाची उंची ३०-४० फूट तर खोडाचा घेर १०-२० फूट असतो. या झाडाची पाने लांब आणि रुंद असतात. तसेच ती चिकट आणि उग्रदेखील असतात. प्रामुख्याने वसंत ऋतूमध्ये या झाडाची वाढ पाहायला मिळते. बाभळाप्रमाणे या झाडालाही डिंक येतो आणि हा डिंक सोनेरी तपकिरी रंगाचा दिसतो. अर्जुनाचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत हे आपण जाणतो पण नेमके कोणत्या रोगांसाठी हे फायदे होतात ते जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

१) हृदयाचे संरक्षण – अर्जुनाची साल हृदयाचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. सामान्य हृदयाची गती ७२ – १५० पेक्षा जास्त असेल तर १ चमचा अर्जुनाच्या सालीची पावडर १ ग्लास टोमॅटो रसात मिसळून प्या. याशिवाय अर्जुनाची १ चमचा बारीक पावडर रोज १ कप दुधातून सकाळी आणि संध्याकाळी घ्या. यामुळे हृदयाच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो आणि हृदयाला शक्ती मिळते. शिवाय अशक्तपणा दूर होऊन हृदयाचे ठोके सामान्य होतात.

२) संसर्गजन्य ताप – कोणत्याही संसर्गामुळे ताप आल्यास त्याच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास अर्जुनाच्या सालीचा २० मिली काढा किंवा चहा प्या. यामुळे लवकर तब्येत सुधारते.

३) गुप्तांगावर सूज – अर्जुनाची साल, कडुलिंबाची साल, चिंचेची साल आणि हळदीची पावडर पाण्यात मिसळून काढा बनवा. रोज १०-२० मिली काढा मध मिसळून सकाळी प्या. यामुळे पित्ताशयात आराम मिळतो. शिवाय लघवी करताना जळजळ होत असेल, वेदना किंवा सूज येत असेल तर अर्जुनाच्या सालीचा काढा आरामदायक आहे.

४) रक्ताच्या गुठळ्या सुटतात – एखाद्या आजारामुळे रक्ताच्या समस्येने ग्रस्त असाल, जसे कि रक्त घट्ट होणे- रक्ताच्या गुठळ्या होणे. यासाठी अर्जुनाची साल अर्जुनाची साल रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी १ ग्लास पाण्यात मिसळून उकळा. हा काढा प्यायल्याने रक्तासंबंधित समस्येत आतां मिळतो.

५) कान आणि तोंड – अर्जुनाच्या पावडरमध्ये तिळाचे तेल टाकून ते तोंडात लावा. नंतर कोमट पाण्याने गार्गल करा. हे तोंडाच्या आजारांवर फायदेशीर आहे. तर अर्जुनाच्या पानांचा रस ३-४ थेंब कानात टाकल्याने कानदुखी संपते.

६) अल्सरवर परिणामकारक – अल्सरच्या जखमांमध्ये अर्जुनाची साल उकळून काढा बनवा आणि प्या. अल्सरच्या जखमा धुण्यासाठी हा काढा फायदेशीर आहे.

७) मासिक पाळीतील वेदना व अधिक रक्तस्त्राव – यासाठी १ कप दुधात १ चमचा अर्जुनाच्या सालीची पावडर १ ग्लास दुधात घालून मंद गॅसवर उकळा. जेव्हा थोडे दूध शिल्लक असेल तेव्हा ते काढून घ्या आणि थंड करा. यानंतर त्यात १० ग्रॅम साखर मिसळून प्या. यामुळे मासिक पाळीमध्ये आराम मिळतो.

८) हाडे मजबूत होतात – कोणत्याही कारणाने हाडे मोडली, दुखावली वा कमकुवत झाली असतील तर अर्जुनाच्या सालीचा काढा प्या. यामुळे हाडांचा त्रास दूर होतोच पण हाडे जोडण्यासही मदत होते.