| | |

सुगंधी लॅव्हेंडर तेलाचे आरोग्याशी जवळचे नाते; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। लॅव्हेंडर’च्या फुलापासून तयार केले जाणारे लव्हेंडर तेल अतिशय सुगंधी असते. अनेको देशांमध्ये हे तेल सौंदर्य प्रसाधन म्हणून मोठ्या प्रमाणात आयात निर्यात केले जाते. याशिवाय हे तेल शरीराच्या विविध रोगांमध्ये गुणकारी असल्याचे सांगितले जाते. कारण या तेलाचा सुगंध मन आणि शरीराला आराम देण्यास सक्षम असते. चला तर जाणून घेऊयात लॅव्हेंडर तेल म्हणजे काय? आणि या तेलाचे आरोग्यवर्धक फायदे कोणते? खालीलप्रमाणे:-

० लव्हेंडर तेल म्हणजे काय?
– लव्हेंडरचे फुल जांभळ्या रंगाचे असते. याचा उपयोग आयुर्वेदिक औषधांसाठी केला जातो. याशिवाय लव्हेंडर तेल एक अशी जडीबुटी आहे जी आपल्या आरोग्यासह आपल्या सौंदर्याचीही काळजी घेते. शिवाय ही जडीबुटी त्वचेसंबंधित समस्यांना दूर करण्यास सक्षम आहे. लव्हेंडरच्या फुलातून तेल काढण्यासाठी ‘स्टीम डिस्टिलेशन‘ ही प्रक्रिया केली जाते. हे तेल सौंदर्य वर्धक लाभ देते.

० लव्हेंडर तेलाचे फायदे –

१) डोकेदुखी – नेहमीच ताण तणाव आणि डोकेदुखीची समस्या असेल तर लव्हेंडर तेल एक नैसर्गिक उपाय आहे. जो डोकेदुखी दूर करण्यास मदत करतो. या तेलात दुखणे कमी करणारे गुणधर्म असतात. याशिवाय हे तेल तणावग्रस्त स्नायूंना आराम देते.

२) मायग्रेन – मायग्रेनची समस्या असेल तर एका रूमालात लव्हेंडर तेलाचे काही थेंब टाका आणि या रूमालाच्या मदतीने तेलाचा सुगंध श्वासाद्वारे आत ओढा. दुसरा पर्याय म्हणजे एक चमचा जैतुन तेलात काही थेंब लव्हेंडर तेल टाका आणि कपाळावर मालिश करा. यामुळे मायग्रेनची समस्या दूर होते.

३) चेहऱ्यावरील डाग दूर होतात – चेहऱ्यावर पिंपल्समुळे येणारे काळे डाग दूर करण्यासाठी लॅव्हेंडर तेल मदत करते. यासाठी चेहऱ्यावर लव्हेंडर तेल लावून मालिश करा. याशिवाय दररोज अंघोळीच्या पाण्यात लव्हेंडर तेलाचे थेंब टाकून अंघोळ करा आणि या समस्येपासून सुटका मिळवा.

४) जळल्याचे, भाजल्याचे डाग कमी होतात – बऱ्याचदा तेलामुळे, आगीमुळे किंवा वाफ लागून शरीरावर जळल्याचे निशाण तयार होतात. अश्या खुणा तुमच्याही शरीरावर असतील तर यासाठी लव्हेंडर तेलाचा उपयोग करा. यासाठी लव्हेंडर तेलाचे काही थेंब जळलेल्या जागी लावावेत. हळूहळू डाग कमी होतात.

५) केसांमधील कोंड्यापासून सुटका – धूळ, माती, प्रदूषण यामुळे कोंड्याची समस्या वाढू लागली आहे. आजकाल तर केसांमध्ये दर दोन दिवसांनी कोंडा होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी आजच लव्हेंडर तेलाचा उपयोग सुरू करा. केसातील कोंडा घालवण्यासाठी लव्हेंडर तेलाचे काही थेंब बदाम वा नारळ तेलात मिसळा आणि केसांना लावावे. यामुळे केसातील कोंडा तर कमी होईल आणि केस चमकदार तसेच सुगंधित राहतील.

६) अनिद्रा ते निद्रा – आजकल कामाचा वाढत ताण यामुळे अनिद्रेची समस्या अनेको लोकांना ग्रासल्याचे दिसून येते. अश्या रुग्णांनी शांत झोपेसाठी लव्हेंडर तेलाचा उपयोग करणे लाभदायक ठरते. कारण या तेलाचा सुगंध इतका मनमोहक असतो की मन आणि शरीर पूर्ण शांत होते. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ सुधारण्यासाठी लॅव्हेंडर तेलाचा प्रयोग लाभदायी ठरतो. परिणामी अनिद्रेची समस्या दूर होते आणि शांत झोप लागते.