Artificial Nails
| |

Artificial Nails: रंगबेरंगी कृत्रिम नखे आरोग्याची लावतील वाट; जाणून घ्या दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हल्ली आर्टिफिशियल नखांचा (Artificial Nails) भलताच नखरा ट्रेंडिंगवर आहे. त्यामुळे तरुण मुलींपासून अगदी स्त्री वर्गात या ट्रेंडिंग फॅशनचा बोलबाला आहे. एखादा सण, सोहळा, लग्न, समारंभ नाहीतर मग एखादी पार्टी असेल तर मेकअपशिवाय स्त्रियांचं पानंही हलत नाही. त्यात आर्टिफिशियल नखांचासुद्धा समावेश आहे बरं. पण मैत्रिणींनो तुमची ट्रेंडिंग फॅशन तुमच्या आरोग्याशी खेळतेय हे तुम्हाला माहित आहे का..? आर्टिफिशियल नेल्सचा वापर हा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

Big Nails

कृत्रिम नखांचे प्रकार (Artificial Nails)

कृत्रिम नखांचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात.
एक म्हणजे ऍक्रेलिक,
दुसरे म्हणजे जेल आणि तिसरे सिल्क. यातील सिल्क हा प्रकार खराब झालेली नखे दुरुस्त करण्यासाठी वा नखे ​​मजबूत करण्यासाठी वापरला जातो. मात्र सध्या स्त्रियांमध्ये ऍक्रेलिक हा प्रकार जास्त लोकप्रिय आहे. कृत्रिम नखांपैकी हा प्रकार प्लॅस्टिकसदृश आहे. यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या पावडरमध्ये द्रव मिसळून एक चिकट मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण चिकटवलेल्या कृत्रिम नखांच्या टोकावर ब्रशच्या सहाय्याने लावले जाते. ज्यामुळे एक कठीण कवच तयार होते. (Artificial Nails)

Artificial Nails

याशिवाय ऍक्रेलिक नखे लावायची असतील तर त्याआधी नैसर्गिक नखे फाईल करून पुरेशी खडबडीत केली जातात. जेणे करून ऍक्रेलिक नखे त्यावर व्यवस्थित सेट करता येतील. तर जेलची कृत्रिम नखे ऍक्रेलिकपेक्षा जास्त महाग असतात.

तसेच जेलची कृत्रिम नखे हि अन्य कोणत्याही नखांपेक्षा जास्त काळ टिकतात. मात्र जेलची कृत्रिम नखे सेट करण्यासाठी आणि जास्त टिकावी म्हणून ते जेल UV किरणांखाली पूर्ण कोरडे करून घ्यावे लागते. या तिन्ही प्रकारच्या कृत्रिम नखांवर नेहमीच्या नेलपॉलिश लावून त्यांचा लूक आणखी उठावदार बनवता येतो. (Artificial Nails)

Silk Nails

चित्रटातील नायिकांप्रमाणे आर्टिफिशीयल नेल्स किंवा कृत्रिम नखे नक्कीच तुमच्या नखांनासुद्धा स्टायलिश लूक देतात. यात काही वादच नाही. शिवाय या नेल्सवर विविध नेल आर्ट करता येत. तर ग्रूम केलेल्या नखांमुळे हातांचे सौंदर्य दहा पटीने वाढते. त्यात अनेकांची नखे नीट वाढत नाहीत किंवा मग ती नाजूक असतात. अश्या स्त्रिया साहजिकच कृत्रिम नखांचा वापर करण्याकडे जास्त झुकते माप देतात. त्यामुळे बाजारात विविध प्रकारची कृत्रिम नखे मिळतात.

स्पष्ट सांगायचे तर, कृत्रिम नखे (Artificial Nails) वापरणे अगदीच काही हानीकारक नाही. मात्र ती बोटांना लावणे आणि काढणे यामध्ये ज्या ऍसिड तसेच रसायनांचा वापर केला जातो त्यामुळे ऍलर्जी होऊ शकते. याशिवाय कृत्रिम नखे वारंवार वापरल्यास खराब झाली तर त्यामुळे फंगल इन्फेक्शनचाही धोका असतो. यामुळे बोटांच्या आणि हळूहळू हातांच्या त्वचेवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येते.

० कृत्रिम नखांमुळे होणाऱ्या समस्या

Artificial Nails

१) नैसर्गिक नखे हि काही काळाने सतत वाढत असतात. त्यामुळे क्यूटिकल आणि ऍक्रेलिक नखे यांच्यात एक गॅप निर्माण होतो. हा गॅप भरून काढण्यासाठी दर २ ते ३ आठवड्यांनी नेल सलूनमध्ये जावे लागते वा स्वतः फिलर लावावे लागते. यामुळे एकतर वेळ वाया जातो. सतत नखं निघणार नाहीत ना याची काळजी वाटते.

मुख्य म्हणजे घरच्या घरी सुद्धा ऍक्रेलिक नखं काढता येतात. (Artificial Nails) पण फिलिंग आणि फाइलिंग करताना जी रसायने वापरली जातात त्यांचा योग्य वापर न झाल्यास नैसर्गिक नखे खराब होऊन कमकुवत होण्याची शक्यता बळावते. तसेच नखांना फंगल इन्फेक्शन होण्याची समस्या असेल तर हि कृत्रिम नखे लावल्याने संसर्ग आणि जखमा दोन्ही वाढू शकतात.

२) जेलची कृत्रिम नखे सेट करताना लावलेले जेल सुकवताना UV लाइटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि डाग पडतात. शिवाय UV लाईट्सचा अति मारा त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. या अतिनील प्रकाशामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचीही संभाव्यता असते.

तसेच कृत्रिम नखे जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी वापरली जाणारी विविध रसायनेदेखील नखांच्या आतील नाजूक त्वचेसह नखांसभोवतालची त्वचा देखील खराब होते. यामुळे नखांभोवती लालसरपणा वा सूज दिसते. शिवाय नखांच्या त्वचेत पस होऊ शकतो. ज्यामुळे जखमा होण्याचीही शक्यता असते. (Artificial Nails)

३) यातील सगळ्यात मुख्य समस्या म्हणजे, कृत्रिम नखे एखाद्या गोष्टीत अडकल्यास किंवा आपटली गेल्यास अर्धवट तुटतात. अशावेळी नखांमध्ये तयार होणारा गॅप हा विषाणूजन्य घटकांसाठी सोयीचा मार्ग ठरतो. परिणामी या गॅपमधून जंतू, यीस्ट किंवा फंगससारखे विषाणू प्रवेश करतात आणि त्या गॅपमध्ये यांची वाढ होते. परिणामी नखांना संसर्ग होऊ शकतो. शिवाय कॅन्सरसारखा रोग होण्याचीही शक्यता बळावते.

४) ऍक्रेलिक किंवा जेल नखे लावण्यासाठी जेव्हडे कष्ट तेव्हढेच ती नखं काढतानाही कष्ट घ्यावे लागतात. ती नखे काढताना आपल्याला बोटे ऍसिटोनमध्ये बुडवून ठेवावी लागतात. हे रसायन नैसर्गिक नखांचे नुकसान करते. यामुळे नैसर्गिक नखे कोरडी होतात आणि त्वचादेखील खराब होते. (Artificial Nails)

५) कृत्रिम नखांच्या सतत वापरामुळे नैसर्गिक नखे पातळ, ठिसूळ आणि कमकुवत होतात. शिवाय हि नखे लावण्याआधी कधी नेल फंगसचा त्रास झाला असेल तर कृत्रिम नखे लावल्यानंतर हि समस्या आणखीच वाढते.

: लक्षात ठेवा :

कधीही LED लाइटसह जेल पॉलिश कडक करणारे सलून निवडा, ज्यामध्ये कमी प्रमाणात UV प्रकाश असेल. तसेच त्या लाईटखाली हात ठेवण्यापूर्वी हातांना ब्रॉड- स्पेक्ट्रम (UVA/UVB) सनस्क्रीन लावायला विसरू नका. दर २ महिन्यांनी कृत्रिम नखांपासून ब्रेक जरूर घ्या. एकंदरच काय तर, आर्टिफिशियल नेल्सची आवड असेल तर त्याचा वापर करा पण नैसर्गिक नखांची काळजी घ्यायला विसरू नका.

‘हे’ पण वाचा :-

वेळीच व्हा सावध!!! हाताची नखे देतात ‘या’ आजारांचे संकेत; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार