| | | |

अशोकाच्या खोडाची साल अतिशय आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या भारतीय संस्कृतीला आयुर्वेदाचा अतिशय प्राचीन वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आजार कोणताही असो आल्याकडे आयुर्वेदामध्ये त्यावर हमखास उपाय आहे. आयुर्वेदात कितीतरी प्राचीन औषधींचा विविध नावांच्या साहाय्याने उल्लेख केलेला आहे,. नुसता उल्लेख नाही तर त्याचे फायदेदेखील सांगितलेले आहेत. असेच एक आरोग्यदायी झाड म्हणजे अशोक. होय अशोक हे एक असे औषधी वृक्ष आहे, ज्याच्या खोडाची साल प्रामुख्याने पारंपरिक आयुर्वेदात उपयुक्त मानली जाते. हे झाड रस्त्याच्या कडेला, बागेमध्ये सहज दिसते. त्यात हे झाड वर्षाचे बारा महिने सावली देते. मात्र, या झाडाला फुले आणि फळ येत नाहीत म्हणून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. पन या झाडाची साल अनेक रोग दूर करू शकते. चला तर जाणून घेऊयात याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) श्वसनासंबंधित समस्या – श्वास घेण्यास अडचण, धाप लागणे किंवा श्वसन विकार या समस्यांवर अशोकाच्या खोडाची साल गुणकारी मानली जाते. यासाठी पारंपरिक सेनेवर हि साल उगळून त्याचे २ थेम्ब नाकात सोडावे. यामुळे श्वसनासंबंधित समस्यांवर आराम मिळतो.

२) मासिक पाळीची समस्या – मासिक पाळीमध्ये अनेक स्त्रियांना अति रक्तस्त्राव, कंबरदुखी आणि अंगदुखीचा त्रास होतो. त्यावेळी आपण अशोकाच्या झाडाची साल वापरून लाभ मिळवू शकतो. यासाठी अशोकाच्या खोडाच्या सालीची पावडर करून कोमट पाण्यामध्ये मिसळावी आणि याचे सेवन करावे. यामुळे लगेच आराम मिळतो.

३) लठ्ठपणाची समस्या – अशोकाच्या झाडाच्या सालीची पावडर तयार करा. हि पावडर दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मधासह मिसळून प्या. यामुळे लठ्ठपणा कमी होतो. परंतु हे पेय प्यायल्यानंतर मळमळ वा उलटीची समस्या जाणवली तर हे पिणे बंद करा आणि डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

४) मूळव्याधाची समस्या – मुळव्याधाची समस्या असेल तर आपण दररोज सकाळी उपाशी पोटी अशोकाच्या झाडाच्या सालीची पावडर अशीच किंवा पाण्यात मिसळून खावी. यामुळे मुळव्याध कमी होण्यास मदत मिळते.

५) त्वचेच्या समस्या – अशोकाच्या झाडाच्या सालीचे सेवन केल्यास रक्त शुद्ध होते. इतकेच नव्हे तर तेलकट त्वचेची समस्यादेखील दूर होते. याशिवाय कोरड्या त्वचेमुळे त्रस्त असाल तर अशोकाच्या झाडाच्या सालीचे सेवन करावे. यामुळे त्वचेत कोमलता येते.

६) महिलांचे आरोग्य – अशोकाचे वृक्ष महिलांना शारीरिक आणि मानसिक ऊर्जा देण्यास सक्षम असते. त्यामुळे अशोकच्या खोडाची पावडर दररोज सकाळी कोमट पाण्यातून घेतल्यास मानसिक आणि शारीरिक थकवा निघून जाण्यास मदत मिळते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा राहते.