Astra Zeneca Vaccine
| |

ओमिक्रॉनवर AstraZeneca’ची लस प्रभावी?; काय सांगतो रिसर्च रिपोर्ट? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोरोनाचा व्हेरियंट ओमिक्रॉन बघता बघता कधी जगभर पसरला तेच कळले नाही. अशावेळी जगभरात एकच चिंता पसरली आहे कि, ओमिक्रॉनचा सामना करायचा कसा? लोकांकडून सतत एकच प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे, Omicronविरुद्ध लस प्रभावी आहे का? यामुळे जगभरातील संशोधक सध्या प्रत्येक लसीवर संशोधन करीत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या नवीन अभ्यासानुसार त्यांचे निकष सांगतात कि, AstraZeneca लसीचा बूस्टर डोस ओमिक्रॉनवर प्रभावी आहे. AstraZeneca लस भारतात Covishield या ब्रँड नावाने उपलब्ध आहे.

संशोधकांच्या अभ्यासानुसार त्यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे कि, AstraZeneca लसीच्या तिसऱ्या डोसनंतर एका महिन्यानंतर ओमिक्रॉनविरुद्ध लढण्यास सक्षम आहे. तर डेल्टा व्हेरियंट विरूद्ध, ही लस दुसऱ्या डोसनंतर लगेच प्रभावी ठरते आहे. भारतात वितरित केलेल्या सर्व लसींपैकी ८५ टक्क्यांहून जास्त लसींचा वाटा Covishieldचा आहे. या कारणास्तव, बूस्टर डोससाठी ही एक आदर्श लस मानली जात नाही. याआधी अमेरिकेतून ओमिक्रॉनवर लसीच्या परिणामाबाबत केलेल्या सुरुवातीच्या संशोधनात असे निदर्शनास आले होते कि, बहुतेक लसीदेखील याविरूद्ध प्रभावी नाहीत. एकमात्र दिलासा म्हणजे लस घेणारी लोकं ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर जास्त गंभीर आजारी पडत नाहीत. अशी लोकं ओमिक्रॉनच्या संसर्गापासून वाचले आहेत.

Oxford-AstraZeneca च्या कोविड-१९ लसीच्या दोन डोसनंतर ३ महिन्यांनी त्याचे संरक्षण कमी होते. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. ब्राझील आणि स्कॉटलंडमधील डाटावरून काढलेले निष्कर्ष असे सूचित करतात की, ज्या लोकांना AstraZeneca लस मिळाली आहे त्यांना गंभीर रोगापासून संरक्षण करण्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता आहे. AstraZeneca लस भारतात Covishield म्हणून ओळखली जाते. संशोधकांनी स्कॉटलंडमधील २० लाख आणि ब्राझीलमधील ४२ लाख लोकांच्या डाटाचे विश्लेषण केले ज्यांना AstraZeneca लस मिळाली होती .