| | |

नाशपतीसारखे दिसणारे एवोकॅडो आरोग्यासाठी पोषक; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निरोगी आरोग्य हवे असेल तर आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे बंधनकारक आहे. यासाठी पोषक आहार अत्यंत महत्वाचा आहे. आपण जे काही खातो त्यातूनच शरीराला पोषण मिळत असते. यात अत्यंत महत्वाची भूमिका फळे बजावतात. कारण फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक समाविष्ट असतात. असेच एक फळ ज्याला सुपर फूड’चा दर्जा प्राप्त आहे. ते म्हणजे एवोकॅडो. होय. एवोकॅडो फळाचा आकार अगदी नाशपतीप्रमाणे असतो. हे फळ आधी फक्त पुएबला आणि मेक्सिको याच ठिकाणी उगवले जायचे. परंतु आता हे फळ जगभरात उगवलेही जाते आणि खाल्लेलंही जाते. हे फळ भारतीय नाही. त्यामुळे ह्याला विशेष असे मराठी नाव देण्यात आलेले नाही. या फळात अनेको औषधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे या फळाची मागणी वाढली आहे. एवोकॅडोत एक मोठी बी असते. तर याच्या वरच्या भागावरील साल टणक असते आणि आतून याचा रंग पिवळा व वरून हिरवा असतो. या फळाचा स्वाद हलका मेवेदार असतो. यामुळे सॅंडविच, सलाड आणि मिल्क शेकमध्ये या फळाचा आवडीने समावेश केला जातो. चला तर जाणून घेऊयात एवोकॅडोचे फायदे.

१) हृदयासाठी फायदेशीर – हृदयाची काळजी घेण्यासाठी एवोकॅडो अत्यंत फायदेशीर आहे. एका संशोधनातून हे लक्षात आले आहे कि, हृदयाचे स्वास्थ कायम उत्तम राखण्यासाठी आणि हृदयासंबंधित रोगांची जोखीम दूर करण्यासाठी एवोकॅडोचे सेवन उपयुक्त आहे. कारण एवोकॅडो मध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्त दाब कमी करणारे गुणधर्म आहेत. जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

२) पचनप्रणालीत सुधार – एवोकॅडो आतड्यासाठी गुणकारी फळ आहे. कारण एवोकॅडोत असलेले फायबर आतड्यांमध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया वाढवते. परिणामी आपली पचनप्रणाली सुधारते आणि यासह आरोग्यदेखील चांगले राहते.

३) बद्धकोष्ठतेमध्ये लाभदायक – एवोकॅडोत फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पचनप्रणाली सुधारण्यात मदत मिळते आणि शरीराची पचनक्रिया व्यवस्थित असेल तर मलत्याग विनाकष्ट होतो. यामुळे पोट साफ न होण्याच्या समस्येने ग्रासलेल्या लोकांनी एवोकॅडोचे सेवन करणे फायदेशीर ठरते. परिणामी बद्धकोष्टतेपासून आराम आणि सुटका मिळू शकते.

४) त्वचा आणि केसांसाठी गुणकारी – एवोकॅडोत विविध विटामिन आणि खनिजं मोठ्या प्रमाणात असतात. जे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे एवोकॅडोचे सेवन केल्यास कोरडी आणि रुक्ष त्वचेचा पोत सुधारतो. शिवाय एवोकॅडोमध्ये विटामिन ए, बी, बी 1, बी 2 आणि सी इत्यादी असतात. या सर्व तत्वांच्या पूर्ततेमुळे केसांची वाढ जलद होतो. यासाठी एवोकॅडो तेलाचा उपयोग करता येईल.

० या टिप्सच्या सहाय्याने उत्तम एवोकॅडो निवडा:-
– एक सारखे आणि डाग नसलेले वजनदार फळ निवडा.
– हे फळ चारही बाजूंनी टणक आहे याची खात्री करून घ्या.
– डाग नसलेले व हलके धब्बे असलेले एवोकॅडो फळ खरेदी करा. मात्र नरम व फुटलेले फळ घेऊ नका.
– योग्य निवड करण्यासाठी एवोकॅडो चे फळ हलवून पहा. जर आतील गर हलत असेल तर ते फळ घेऊ नका.