Winter
|

थंड वारा असा टाळा; जाणून घ्या बचावाचे उत्तम पर्याय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। देशभरातील थंडी आता ओसरू लागली आहे. पण देशातील अनेक भागात थंडीची लाट अजूनही तितकीच तीव्र उसळते आहे. यामुळे थंड वाऱ्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. अशा वातावरणात सूर्य देखील बाहेर यायला घाबरतो असे अनेकजण म्हणतात. थंडीची तीव्रता पाहता अनेक लोकांना सातत्याने सर्दी, कफ आणि खोकल्याची समस्या होताना दिसत आहे. तीव्र थंडीसोबत वाहणाऱ्या थंड वाऱ्याने आणखीच लोकांना हैराण केले आहे. त्यामुळे कधी एकदा कडाक्याचे ऊन पडते आणि थंडी पळून जाते असे काहीसे लोकांना वाटू लागले आहे. अश्या दिवसांमध्ये वाहणारे थंड वारे हे कुणालाच नकोसे असतात. कारण हे वारे आरोग्यसाठी अतिशय नुकसानदायी ठरतात. त्यामुळे अश्या वाऱ्यांपासून वाचण्यासाठी लोक देशी विदेशी जुगाड आजमावताना दिसतात. जसे कि माकडटोपी वापरणे, उबदार कपडे, स्कार्फ, कापसाचे बोळे आणि रात्रीची शेकोटी. पण तरीही काहीच फरक पडला नाही कि थंडीची हुडहुडी आणखीच जाणवते.

हिवाळ्यात वाहणारे थंड वारे हे विविध प्रकारे हानिकारक ठरू शकतात. यामध्ये वृद्ध लोकांत संयुक्त समस्या दिसून येतात. दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, थंडीच्या कडक लाटेमुळे मृतांचा आकडा वाढला आहे. यामुळे जनमानसांत थंडीविषयी भीती निर्माण झाली आहे. पण मित्रांनो घाबरण्याची गरज नाही कारण, थंडीचा जोर वाढला की सर्वसाधारणपणे आपल्याला आपल्या रोजच्या रुटीनमध्ये काही बदल करणे गरजेचे असते. जे माहित नसल्याचं जास्त त्रास होतो. म्हणूनच स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

थंडीपासून बचावासाठी काय करालं?

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या सल्ल्यानुसार, 
- कडक थंडीमध्ये चहा, कॉफी इत्यादी गरम पदार्थ प्या.
- याशिवाय आल्याचा चहादेखील नक्कीच खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण अशा पेयांच्या सेवनामुळे शरीराचे तापमान उच्च आणि उष्ण राहते.

थंडीच्या वातावरणात काय करू नये?

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितल्याप्रमाणे थंडीपासून बचाव करण्यासाठी,
- मद्यपान करू नये. कारण अल्कोहोल शरीराचे तापमान कमी करते. यामुळे थंडीच्या दिवसात मद्यपान करणे हानिकारक ठरू शकते.
- शिवाय हिवाळा टाळण्यासाठी उबदार कपडे घालावे. यात प्रामुख्याने कानटोपीचा समावेश असणे गरजेचे आहे. यामुळे थंड हवा कानापर्यंत जास्त पोहचत नाही.
- तसेच हातमोजे वापरण्याऐवजी मिटन्स वापरावे. कारण, हातमोजेपेक्षा मिटन्स गरम असतात आणि यामध्ये बोटे वेगळी नसतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरात उष्णता राहते.
- या व्यतिरिक्त हिवाळ्यात आपल्या आहारात डॉक्टरांच्या सल्ल्याने तिळाचे तेल समाविष्ट केल्यास शरीरात उष्णता साठवण्यास मदत होते.