| | |

वृत्तपत्रात बांधलेले पदार्थ खाणे टाळा अन्यथा आरोग्याचे नुकसान निश्चित; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल घरचे जेवण म्हटले कि अनेकांची नाक कशी सहज मुरडली जातात. अश्या लोकांच्या घरच्या डाळ भातापेक्षा बाहेरचे वडे समोसे अतिप्रिय असतात. आपण सारेच जाणतो कि हॉटेलमध्ये विकल्या जाणाऱ्या या पदार्थांची डिमांड फारच कमी असते. मात्र रस्त्यावरून चालताना एखादा गरमा गरम वडे, समोसे किंवा मग भज्या तळण्याचा वास आला कि मग आपसूकच पाय तिकडे वळले म्हणजे वळलेच.

बहुतेकदा हे पदार्थ दादा पार्सल द्या असे म्हणत घरी नेले जातात. मग हे पदार्थ ती व्यक्त एखाद्या वर्तमान पात्राच्या थोडक्या कागदात अगदी सहज गुंडाळले, त्याला डोरा बांधते आणि आपल्या हाती सुपूर्त करते. मग काय? आपणही मोठ्या ऐटीत हे पदार्थ असे घरी घेऊन जातो. पण तुम्हाला माहित आहे का? हे असे वर्तमानपत्रात गुंडालेले पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक असतात. होय तुम्ही अगदी योग्य वाचलात. हानिकारक.

याचे कारण असे कि, वर्तमान पत्र छापतेवेळी त्यावर मजकूर उटवण्याकरिता एक विशिष्ट शाई वापरली जाते. या शाईच्या वापरामुळे एका सध्या कागदावर मशीनच्या साहाय्याने मजकूर लिहिला जातो. पण एखादा पदार्थ या वर्तमान पात्रात बांधल्याने त्याची शाई पदार्थाला लागण्याची शक्यता असते आणि परिणामी आपल्या पोटात ती जाऊ शकते. हि शाई मानवी शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय निकृष्ट असते.

– एफएसएसआय अर्थात द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ हे कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात हळूहळू विष पसरविण्याचे काम करते.

– प्रामुख्याने रस्त्यावर आणि अस्वच्छ जागी जे पदार्थ बनवून विकले जातात ते वर्तमानपत्रात पॅक करुन दिले जातात. परिणामी वर्तमान पात्राची शाई पदार्थाना चिकटते आणि पोटात जाते. यामुळे कॅन्सरही होऊ शकतो असे या संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे पदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर टाळण्याची सूचना द्यावी.

– वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी जी शाई वापरली जाते ती आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. त्यामुळे पदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्र टाळाण्याचे आवाहन या संस्थेमार्फत केले जात आहे.