| | |

कच्चे स्प्राऊट्स खाणे टाळा; जाणून घ्या कारण आणि खाण्याची योग्य पद्धत

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बारीक व्हायचं असेल तर सर्वोत्तम डाएट पद्धतीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे हे आजकाल अगदीच सर्वसामान्य बाब झाली आहे. यात प्रामुख्याने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे स्प्राऊट्स. स्प्राऊट्स म्हणजे अंकुरलेल्या धान्यांचा आहार. यामध्ये मूग, काळे हरभरे आणि अगदी शेंगांचा समावेश असतो. असा आहार घेतल्याने पचन संबंधित समस्या होतात होतात. शिवाय रक्तातील साखरेची पातळी सुधारते आणि हृदयाचे विविध विकारापासून संरक्षण होते. याशिवाय स्प्राऊट्स मध्ये कार्ब्स आणि कोलेस्ट्रॉल नसते. परिणामी वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. मुख्य म्हणजे स्प्राऊट्समध्ये अँटि ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन D सह अनेक पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी स्प्राऊट्स खाणे फायदेशीर आहे. पण मित्रांनो तुम्हाला स्प्राऊट्स खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? जर याचे उत्तर नाही असे असेल तर लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० कच्चे स्प्राउट्स खाणे टाळा, कारण…
– तज्ञ सांगतात कि, कच्च्या स्प्राउट्समध्ये हानिकारक जीवाणू असतात. त्यामुळे अश्या आहारातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. स्प्राउट्स खाल्ल्यानंतर जर १२ ते ७२ तासांनंतर अतिसार, पोटदुखी आणि उलट्या यांपैकी कोणतेही अन्न विषबाधासारखी लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे स्वस्थ व्यक्तीला मोठी समस्या निर्माण होत नसली तरीही लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांच्या बाबतीत गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

० स्प्राउट्स खाण्याची योग्य पद्धत

१) बरेच लोक कच्चे स्प्राउट्स खातात आणि अगदी आरामात पचवतात. पण तरीही खबरदारी म्हणून एका पॅनमध्ये स्प्राउट्स थोडे तेल घालून गरम करून घ्या. कारण असे केल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी मदत होते.
– याशिवाय मिठाच्या पाण्यात साधारण १० मिनिटे स्प्राऊट्स उकळून खाल्ल्याने पोटाला बाधा होत नाही.
– शिवाय स्प्राउट्स शिजवल्याने पचनसंस्थेला फायदा होतो.
– तसेच पचनसंस्था पोषक तत्वांच्या शोषणासाठी सक्रिय होते.

२) आपली रोग प्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कच्चे स्प्राउट्स खा. पण जर तुम्हाला पोटाची काळजी असेल तर ते थोडे शिजवून खाणेच चांगले राहील. कारण,
– शिजवलेल्या स्प्राउट्सच्या तुलनेत कच्चे स्प्राउट्स पचण्यास कठीण असतात. परिणामी पचनसंस्थेचे नुकसान होते. म्हणून स्प्राऊट्स खाताना एकतर ते थोडेसे पॅनवर भाजून खा.
– किंवा स्प्राऊट्स उकडून घेतले तरी उत्तम. मात्र उकडलेल्या स्प्राऊट्सचे पाणी फेकून देऊ नका तर तेसुद्धा प्या. यामुळे शरीराला पोषक तत्त्वे प्राप्त होतील.

३) काही लोकांचे शरीर बियाणे आणि शेंगांचे सर्व पोषक घटक त्यांच्या कच्च्या स्वरूपात शोषून घेण्यास असमर्थ असतात.
– त्यामुळे स्प्राउट्स थोडे शिजवून घ्या आणि मगच खा.
– याशिवाय स्प्राऊट्स शिजवताना त्यात हलके काळे मीठ घाला आणि खा. यामुळे ते पचण्यासाठी मदत होईल.
– स्प्राऊट्सचे पाणी फेकण्यापेक्षा प्या म्हणजे त्यातील द्रव्याच्या सहाय्याने त्यातील पोषकद्रव्ये शरीरात सहज शोषली जातात.