| |

पावसाळ्याच्या दिवसात स्प्राऊट्स खाणे टाळावे, कारण…; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या आहारात मोड आलेले कडधान्य असणे अतिशय फायदेशीर असते हे आपण सगळेच जाणतो. यामुळे आपल्याला आरोग्य आणि सौंदर्य यांच्याशी संबंधित बरेच फायदे मिळू शकतात. पण मुख्य बाब अशी कि, प्रत्येक निरोगी वस्तू नेहमीच चांगले फायदे देते असे नसते. तर सांगायची बाब हि कि, मोड आलेले कडधान्य इतर दिवसात खूप फायदे देणारे असते हे कितीही मान्य असले तरीही पावसाळ्याच्या दिवसात मात्र हे खाणे आपल्यासाठी हानिकारक होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल असे कसे शक्य आहे? पण हेच सत्य आहे. त्यामागे नेमके कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

– पावसाच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने फूड पॉइझन अर्थात अन्नातून विषबाधा होण्याच्या तक्रारी संभवतात. शिवाय पोट बिघाडाच्याही तक्रारी सर्वात जास्त याच दिवसात उदभवतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे पाणी. याशिवाय इतर पदार्थांमध्ये असलेले जिवाणू. ज्यामुळे होणारे संसर्ग आपल्या पोटाशी संबंधित क्रियांमध्ये अडथळा निर्माण करतात. इतकेच नव्हे तर यामुळे उलट्या, ताप, कावीळ, अतिसार अश्या अनेक समस्या उदभवतात.

  • पावसाळी दिवसांत अंकुरलेले कडधान्य न खाण्याचा सल्ला आहार तज्ञांकडून दिला जातो. कारण हि कडधान्य बराच काळ पाण्यात भिजवलेले असतात. त्यामुळे यामध्ये जास्त काळ ओलावा टिकून राहतो आणि पावसाळ्याच्या दिवसात ओलावा असलेल्या कडधान्यात धोकादायक जिवाणू तयार झाल्याने आरोग्यास धोका वाढतो.
  • कडधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण हे इतर पदार्थांपेक्षा जास्त असते. जे पोट स्वच्छ करण्यास मदत करतात. मात्र पावसाळ्याचे दिवसात यांचे सेवन केल्याने पोटाच्या वाढ होण्याची शक्यता असते कारण या दिवसात पचन क्षमता कमकुवत असते. त्यामुळे अतिसारसारखी समस्या उद्भवू शकते. परिणामी, शरीरात पाणी आणि पोषकतत्वांची कमतरता होऊ शकते.

* टीप – पावसाळ्यात कडधान्ये खाऊच नये असा नियम नाही. त्यामुळे जर तुम्ही अंकुरलेले कडधान्य खाण्यास इच्छुक असाल तर, यासाठी कडधान्ये चांगल्या प्रकारे उकळवा आणि ताजे असताना वापरा. ज्यामुळे त्यात अधिक ओलावा राहणार नाही आणि विषाणू तयार होण्याची क्षमता कमी होईल.
तसेच कडधान्ये मिठाच्या पाण्यात भिजवून नंतर कोमट पाण्याने स्वच्छ करून वापरावी.