asafoetida.

पोटदुखीच्या समस्येवर हिंगाचे अप्रतिम गुण

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या दररोज च्या वापरात हिंग हे असते. प्रत्येक  घरात मसाल्यांच्या डब्यात हिंगाचा वापर हा केला जातोच . हिंग हे अनेक आजारांवर गुणकारी आहे . तसेच आहारातील स्वादिष्टपणा वाढवण्यास हिंग मदत करते . हिंगामध्ये फायबर , प्रोटिन्स , कॅल्शियम आणि शरीराला आवश्यक असलेले घटक हे हिंगापासून मिळतात.

हिंगाचे फायदे —

पोटाच्या ज्या काही समस्या या जाणवत असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी हिंग हे शरीरासाठी खाल्ले जावे. ज्यावेळी पोट दुखत असेल तर त्यावेळी गरम पाण्याच्या मदतीने हिंगाचा काही भाग उकळवून घेऊन तो पिला जावा. त्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो. तसेच गॅस असेल तर तो सुद्धा दूर होण्यास मदत होते .

लहान बालांसाठी फायदेशीर —

नवजात बाळाच्या पोटाच्या किंवा नाभीच्या जवळ जर हिंग आणि पाणी यांचे द्रव्य तयार करून लावले तर मात्र बाळाच्या पोटातील गॅस च्या समस्या या दूर होण्यास मदत होते . अशा वेळी बाळ हे आनंदाने खेळू शकेल.

भूक वाढणे —–

जर अपचनाच्या समस्या या जास्त प्रमाणात वाढल्या तर मात्र हिंग हे कोमट पाण्याच्या मदतीने आहारात घ्यावे . अपचनासाठी मीठ आणि हिंग याचे मिश्रण हे एकत्र घेऊन त्याचा वापर हा आहारात करा . त्यामुळे भूक वाढण्यास मदत होऊ शकते .

खोकला होतो दूर —

जर हिंगासोबत मध आणि आल्याचा छोटा तुकडा एकत्र करून त्याचा वापर जर पोटासाठी करत असू तर त्याचा फायदा होऊन खोकला हा दूर राहण्यास मदत करते .

मधुमेह —-

डाळ आणि भाजी एकत्र करून त्याच्यावर हिंग आणि तूप याचा वापर केला मात्र मधुमेह हा नियंत्रणात येऊ शकतो.