| | |

आयुर्वेद सांगते आजारपणाचे कारण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेद हि देखील एक उच्च मानप्राप्त संस्कृती आहे. आयुर्वेद हि एक परंपरा आहे जी मानपूर्वक वर्षानुवर्षे अमलात आणली जात आहे. अनेको वर्षांपूर्वी आयुर्वेदाचा उगम झाला. अनेक ऋषीमुनींनी एकत्र येऊन आयुर्वेदातील प्रत्येक लहानातील लहान आजारावरील उपायापासून अगदी गंभीर रोगांवर जालीम उपाय तयार केले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कोणत्याही रोगाचे मूळ कारण हे शरीरातील त्रिदोष किंवा ह्यूमर्स असंतुलन असणे असते. ज्यामुळे शरीराच्या इतर घटकांमध्ये साहजिकच असंतुलन निर्माण होते. परिणामी रोग अपरिहार्यपणे होतो. म्हणून आज आपण आयुर्वेदात आजारपणाबद्दल काय सांगितले आहे ते जाणून घेणार आहोत.

रोगाची अनेक कारणे असू शकतात. पण आयुर्वेद सांगते कि, प्रज्ञापराध, असात्म्येन्द्रियार्थ संयोग आणि परिनामा या कारणांमुळे आजारपण होण्याची दाट शक्यता असते. ही कारणे अगदी सूक्ष्म वाटतात. पण तरीही आपण दिवसेंदिवस करत असलेल्या आरोग्यविषयक चुकाच आपल्या आरोग्याला हानी पोहचवत असतात. हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या या तिन्ही कारणांची माहिती खालीलप्रमाणे:-

१) प्रज्ञापराध – आयुर्वेदानुसार प्रज्ञापराध हे प्रत्येक रोगाचे मूळ कारण आहे. प्रज्ञापराध हा शब्द २ शब्दांपासून बनलेला आहे. यातील पहिला ‘प्रज्ञा’ आणि दुसरा ‘आराधा’. प्रज्ञा म्हणजे ज्ञान आणि अपराध म्हणजे चूक. ज्ञान असूनही चूक करणे वा दुर्लक्ष करणे हे प्रज्ञाप्रधान आहे. दुसऱ्या शब्दानुसार असे म्हणता येईल की जेव्हा आपण आपल्या बुद्धीचा गैरवापर करतो तेव्हा आपण रोगाकडे जातो.
– उदाहरणार्थ,
जंक फूड खाण्याची इच्छा होणे आणि आपण ते खाणे. जंक फूड आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही हे माहित असूनही आपण केवळ लालसेपोटी ते खातो.

२) असात्म्येन्द्रियार्थ संयोग – अस्माया म्हणजे “अयोग्य”, इंद्रिय म्हणजे “इंद्रिय अंग” किंवा “इंद्रियांच्या वस्तू” आणि संयोग म्हणजे “मिळणे” किंवा “जोडणे”. अर्थात असात्म्येन्द्रियार्थ संयोग म्हणजे इंद्रियांचा त्यांच्या वस्तूंशी अयोग्य संवाद. परिणामी अति उत्तेजना वा संवेदनात्मक क्रियाकलापांचा अभाव. याव्यतिरिक्त आपण असेही म्हणू शकतो कि, इंद्रियांचा गैरवापर. कारण हे शरीर आणि मनाला हानी पोहोचवते. तर निरोगी कार्यासाठी आंतरिक आणि बाह्यरित्या संयम आणि सुसंवाद प्रस्थापित करणे अतिशय गरजेचे आहे. इंद्रियांचा उपयोग सुख आणि वेदना यांच्यात फरक करण्यास मदत करतो. प्रत्येक संवेदनांमधून आपण काय घेतो हे पाहणे गरजेचे आहे.
– उदाहरणार्थ,
संबंधित संवेदना आपल्या इंद्रियांना पोषण देते का? वा ती त्रासदायक ठरते. याशिवाय अतिउत्साही करते का आळशी बनवते? हि निवड आपली वेळोवेळी चुकणे.

३) परिनामा – परिनामाला काळ किंवा ऋतूतील भिन्नता असे म्हणता येईल. परिनामा सामान्यतः काळाचे परिणाम आणि कालांतराने होणारे नैसर्गिक शारीरिक बदल यांचा संदर्भ देते
– उदाहरणार्थ,
दिवस-रात्र चक्र, ऋतु बदल, गर्भधारणा, कालावधी, जन्म, रजोनिवृत्ती आणि मृत्यू-संबंधित जीवनाची चक्रे. यातील प्रत्येक चक्राशी ताळमेळ ठेवत नसल्यास आपण आरोग्यविषयक त्रास ओढवून घेतो.