benifits of ova

सुगंधित ओव्याचे आयुर्वेदीक फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या घरात ओवा हा ठेवलाच जातो. ओव्याचे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे आहेत. लहान बाळापासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळे जण आपल्याला अपचनाच्या किंवा पोटाच्या समस्या निर्माण झाल्या कि त्यावेळी ओवा हा खाल्ला जातो. सर्वसामान्यांच्या घरात ओवा हा आढळतोच. छोट्यातल्या छोट्या आजारांवर सुद्धा घरगुती उपायांचा वापर हा केला जातो. ओवा हा नैसर्गिक रित्या ल लाभकारक आहे. ओव्याचे आयुर्वेदीक आणि औषधी पण गुणधर्म आहेत. त्याचे फायदे जाणून घेऊया ….

 

— ओवा हा सुगंधित असून त्याचा वापर हा आपल्या आहारातील पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो . आहारात असलेले पदार्थ जे काही बनवले जातात ते पदार्थ पचले जाण्यासाठी त्या पदार्थांमध्ये ओवा यांचा वापर केला जातो.

—- ओव्यांमध्ये पचनक्षमता मजबूत करण्यासाठी खूप सहकार्य करते.

—- ओव्या मध्ये असलेले ‘थायमॉल’ हे रासायनिक घटक आहेत. हा रासायनिक घटक आपली पचनक्रिया चांगली करण्यास मदत करते.

—- चिमूटभर मीठ घालून तळहातावर थोडासा चोळलेला ओवा चघळणे आणि गिळून टाकणे पोटाच्या विकारांसाठी गुणकारी ठरते.

— रात्री एका चमचा ओवा पाण्यात घालून त्याचा वापर हा आपल्या आहारात करा. त्यामुळे पोटदुखीच्या ज्या काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी सुद्धा ओव्याचा वापर हा जास्त केला जातो.

— अनेकांना वाताचा त्रास हा होत असतो . त्यावेळी वाताचा त्रास कमी करण्यासाठी ओवा याचा त्रास हा कमी होऊ शकतो.